Assembly Election 2024 : मोठी बातमी ! लोकसभेपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय भूकंप, केंद्रस्थान नागपूर ?

Maharashtra Politics : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे करणार असल्याचं सर्वश्रुत आहे.
Maharashtra Politics :
Maharashtra Politics : Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड अस्थिरता आली आहे. कधी कोणाचा गेम होईल, हे सांगता येत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर गटा-तटाची न्यायालयीन लढाया सुरू आहेत. या दोन्ही पक्षांतील नेते आपापल्या राजकीय अस्तित्वासाठी धडपडत आहेत. भाजप नेते ही मजा लांबून पाहत आहेत. परंतु, दुसऱ्याच्या घरात लावलेली आग आपल्यापर्यंत कधी येऊन पोहोचेल, याचा अंदाज नसतो. तसे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील सध्याची स्थिती होऊ शकते, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात सध्या जे घडतंय, त्याचा सर्व रोख भाजपकडे जातो. यातून भाजपच्या प्रतिमेला तडे जात असल्याची चर्चा आहे. त्यातून सावरण्यासाठी दिल्लीतून सध्या महाराष्ट्रात वेगवेगळे प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून राजधानीतून भाजप हायकमांड महाराष्ट्रात हुकमाचा पत्ता खोलण्याच्या तयारीत असल्याचेही काही नेते खासगीत सांगत आहेत. हा बदल म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा महाराष्ट्रात येण्याची चिन्हे वर्तवित आहेत. तशी भाजपच्या पक्ष संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चाही रंगली आहे. हा बदल होताना महाराष्ट्रातील मोठा नेता दिल्लीत जाऊ शकतो. या बदलाच्या हालचालींचे केंद्र नागपूर असेल, हेही सांगितले जात आहे. या चर्चेनुसार हा नेतृत्वातील बदल पुढच्या सहा- आठ महिन्यांत होऊ शकतो.

महाराष्ट्रावर भाजप हायकमांडचे बारीक लक्ष

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे करणार असल्याचं सर्वश्रुत आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोडीवर दिल्ली भाजप हायकमांडचे बारकाईने लक्ष आहे. शिवसेना-भाजप युती न झाल्याने राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. यामुळे दिल्लीत भाजप प्रचंड अस्वस्थ आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना-राष्ट्रवादीचे पटत नसल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत फूट पडली. शिंदे गट वेगळा झाला. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. भाजपच्या मदतीने अजित पवार गट सत्तेत आला आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. 'त्रिशुल' सरकार महाराष्ट्रात विराजमान झाले. परंतु या 'त्रिशुल' सरकारला जनतेच्या मनावर अजून तरी राज्य करण्यात यश आलं नसल्याचं भाजप संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी नावे चर्चेत आणणे राजकीय खेळी

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलण्याचे वारे वाहत आहेत. अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत येते. अजित पवारांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत आणणे ही एक राजकीय खेळी आहे. या चर्चेवर अजित पवारसुद्धा बोलत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अलीकडे दिल्ली दौरेदेखील वाढले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्यात सक्रिय असले, तरी ते अलीकडे संपूर्ण ताकदीने महाराष्ट्रात वावरताना दिसत नाहीत. नागपूरमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीवेळी त्यांचा सुटलेला संयम! हे त्याचे उदाहरण आहे.

Maharashtra Politics :
MNS On Loksabha : प्रकाश महाजनांच्या उमेदवारीने कोणाचं चांगभलं होणार ?

यामुळे भाजपमध्ये बदलांचे वारे वाहत असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचे हायकमांड लोकसभेपूर्वी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीतील नेता महाराष्ट्रात आणून महाराष्ट्रातील नेता दिल्लीत देण्याच्या तयारीत आहेत. हा बदल नागपुरात होऊ शकतो, असेदेखील कार्यकर्ते, पदाधिकारी चर्चा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्याच्या तयारीत आहे, असे सांगण्यात येत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Maharashtra Politics :
AAP Pimpri Chinchwad News : आपच्या कार्यकारिणीत सहा 'डॉक्टर'; पक्षवाढीसाठी 'शस्त्रक्रिया' करणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com