CAT 2026 exam date and registration: IIM मध्ये MBA करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. CAT 2026 परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज, 22 सप्टेंबर 2026 रोजी अंतिम मुदत आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप CAT 2026 Registration केलेले नाही, त्यांनी आज संध्याकाळी 5 वाजण्यापूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जाची विंडो बंद केली जाणार आहे.
IIM इंदूरकडून यंदाची CAT 2026 परीक्षा आयोजित केली जात आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की, 22 सप्टेंबरनंतर अर्जाची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याऐवजी अर्जासोबत CAT Application Fee देखील वेळेत भरावी. तांत्रिक अडचणींमुळे अर्ज प्रक्रिया अपूर्ण राहू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
CAT 2026 Registration करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जाऊन ‘न्यू कॅंडिडेट रजिस्ट्रेशन’ पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नाव, ई-मेल, मोबाइल नंबर आणि आवश्यक माहिती भरून OTP Verification पूर्ण करावे.
नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या User ID आणि Password च्या माध्यमातून लॉगिन करून शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरावी. यानंतर परीक्षा केंद्रांसाठी 5 शहरांची निवड, आवश्यक कागदपत्रे अपलोड आणि ऑनलाइन शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
CAT 2026 Exam 29 नोव्हेंबर 2026 रोजी देशभरातील सुमारे 170 शहरांमध्ये 3 शिफ्टमध्ये Computer Based Test पद्धतीने होणार आहे. CAT 2026 Admit Card 4 नोव्हेंबर 2026 पासून उपलब्ध होईल. फॉर्म करेक्शन विंडो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खुली होण्याची शक्यता आहे.
CAT Scoreच्या आधारे उमेदवार IIMs तसेच सहभागी अन्य B-Schools मधील MBA आणि विविध Postgraduate Management Programmes साठी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
CAT 2026 Eligibilityनुसार उमेदवाराकडे किमान 50% गुण किंवा त्याच्या समतुल्य CGPA असलेली Bachelor’s Degree असणे आवश्यक आहे. SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी किमान 45% गुण आवश्यक आहेत. अंतिम वर्षातील विद्यार्थीही निर्धारित अटी पूर्ण करत असल्यास CAT 2026 साठी अर्ज करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.