मोठी बातमी! महाराष्ट्रात पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; दिवाळीपूर्वी होणार मोठा धमाका!

Maharashtra MLC graduates teachers constituency election date 2026 : महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मतदानाची तारीख, निवडणूक वेळापत्रक आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घ्या.
मोठी बातमी! महाराष्ट्रात पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; दिवाळीपूर्वी होणार मोठा धमाका!
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह पदवीधर आणि शिक्षक मतदारांमध्येही निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.

औरंगाबाद, पुणे आणि नागपूर पदवीधर आणि अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे. या जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदान आणि मतमोजणीपर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रात पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; दिवाळीपूर्वी होणार मोठा धमाका!
Teachers EKYC: शिक्षकांसाठी मोठी बातमी! ई-केवायसीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; न केल्यास ऑक्टोबरचा पगार रोखणार!

विधान परिषद निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

  • अधिसूचना जारी : 29 सप्टेंबर 2026

  • उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख : 6 ऑक्टोबर 2026

  • अर्जांची छाननी : 7 ऑक्टोबर 2026

  • उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 ऑक्टोबर 2026

  • मतदान : 23 ऑक्टोबर 2026

  • मतमोजणी आणि निकाल : 27 ऑक्टोबर 2026

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचे नियमही वेगळे आहेत. ECI च्या माहितीनुसार पदवीधर मतदारसंघासाठी पात्रतेच्या निकषांनुसार संबंधित व्यक्ती पदवीधर असणे आवश्यक आहे, तर शिक्षक मतदारसंघासाठी निर्धारित कालावधीत पात्र शैक्षणिक संस्थेत अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चिती, प्रचार आणि मतदारांशी संपर्क वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रात पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; दिवाळीपूर्वी होणार मोठा धमाका!
Paryushan school food controversy : पर्यूषण काळात डब्यात मेथीची भाजी; विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड, शाळेला नोटीस

महाराष्ट्रातील या 5 मतदारसंघांमधील निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार असून, पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा कौल कोणत्या दिशेने जातो, याकडे राज्याचे लक्ष असेल. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी आपली तयारी सुरू केली असून, आगामी काळात प्रचाराचा धुरळा पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com