CBI officials arrest ED Deputy Director Chintan Raghuvanshi red-handed at his Bhubaneswar office for accepting a ₹20 lakh bribe.  Sarkarnama
देश

ED officer arrested : २० लाखांची लाच घेताना ‘ED’च्या उपसंचालकास 'CBI'ने कार्यालयातच रंगेहाथ पकडलं

CBI arrests ED officer for bribery : जाणून घ्या, नेमकी कुठं झाली ही कारवाई आणि कोणत्या प्रकरणात मागितलही होती लाच?

Mayur Ratnaparkhe

CBI Arrests ED Officer Chintan Raghuvanshi in Bribery Case : केंद्रीय अन्वेषण विभागाने(CBI) अंमलबजावणी संचालनालयाचे(ED) उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना तब्बल २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या करावाईमुळे एकच खळबळ उडाली असून, या कारवाईकडे भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. 

हे प्रकरण ओडिशामधील ढेंकनाल जिल्ह्यातील खाण व्यावसायिक रतिकांत राऊत यांच्या तक्रारीवर आधारित आङे. राऊत यांनी आरोप केला की त्यांना ईडी कडून 2024मध्ये एक समन्स आले होते, ज्यानंतर जानेवारी २०२५मध्ये त्यांच्या कार्यालयावर छापेमारी झाली. समन्सच्या उत्तरात जेव्हा मी ईडी कार्यालयात पोहचलो, तेव्हा चिंतन रघुवंशी यांनी चौकशी केली होती.

काही कालावधीनंतर एका मध्यस्थीद्वारे रतिकांत राऊत यांच्याशी संपर्क साधला गेला आणि पाच कोटी रुपयांची लाच मागितली गेली. अनेकवेळा चर्चा झाल्यानंतर ही रक्कम दोन कोटी निश्चित झाली. ज्याअंतर्गत २८ मे रोजी २० लाख रुपयांचा पहिला हप्ता मागितला गेला होता.

रतिकांत राऊत यांनी याबाबतची माहिती थेट सीबीआयला दिली. सीबीआयनेही योजनाबद्धरित्या सापळा रचला आणि जसं चिंतन रघुवंशी यांनी भुवनेश्वरच्या नयापल्ली येथील ईडी कार्यलयात पैसे स्वीकारले, तेव्हा त्यांना रंगेहाथ अटक केली गेली.

अटकेनंतर तत्काळ आरोपी अधिकाऱ्यास वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले गेले आणि नंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सीबीआयने त्यांच्या घर, कार्यालय आणि अन्य ठिकाणांवरही छापेमारी केली आणि या प्रकरणाची नोंद भ्रष्टाचार निवारण अधिनियमांतर्गत केली. आता पुढील अधिक तपास सुरू आहे, सीबीआयचा अंदाज आहे की या प्रकरणात आणखी काही नावंही समोर येवू शकतात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT