Kanchan Gadkari Giant onion farming : अबब! एक कांदा चक्क एक किलोचा अन् एकारात १३ टण उत्पादन; कांचन गडकरींचा अनोखा प्रयोग

Kanchan Gadkari grows 1 kg onion and 13 tons per acre using innovative farming : अभिनव प्रयोग करण्याच्या नितीन गडकरींच्या सवयीप्रमाणेच, आता मिसेस गडकरींनीही कृषी क्षेत्रात अफालतून प्रयोगांची मालिका सुरू केल्याचे दिसत आहे.
Farmer Kanchan Gadkari holding a giant 1 kg onion from her experimental farm, where she produced 13 tons per acre using an innovative method.
Farmer Kanchan Gadkari holding a giant 1 kg onion from her experimental farm, where she produced 13 tons per acre using an innovative method. sarkarnama
Published on
Updated on

Kanchan Gadkari’s Revolutionary Onion Farming Technique : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे नेहमीच मोठे आणि अनोखे प्रयोग करीत असतात. देशभरात रस्त्यांचे विणलेले जोळे आणि उड्डाणपूल याची साक्ष देत आहेत. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी सुद्धा एक अभिनव प्रयोग यशस्वी केला आहे. या प्रयोगातून शेतकऱ्यांना संपन्न करण्याचाही संकल्प त्यांनी केला आहे.

एका एकरात तब्बल १३ टण कांद्याचे उत्पादन त्यांनी घेवून दाखवले. त्यांच्या आधुनिक व नैसर्गिक शेतीमधील एका कांद्याचे वजन चारशे ते आठशे ग्राम इतके आहे. तर जवळपास एक किलोचा एक कांदा हा सर्वांच्याच कुतूहल आणि आकर्षणाचा विषय झाला आहे. या पद्धतीचा स्वीकार केल्यास उत्पादनकांना कांदा रडवण्याऐवजी हसवू शकतो, असेच म्हणावे लागेल.

कुठलाही प्रकल्प असो नितीन गडकरी नेहमीच त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आले आहेत. त्यांच्या काही घोषणा सुरुवातीला अनेकांना हास्यापदही वाटतात. मात्र त्यांनी त्या यशस्वी करून दाखवून टीकाकारांना तोंडात बोटे घालायला लावली आहेत. विदर्भात उसाचे उत्पादन होत नव्हते. मात्र गडकरींनी ते घेऊन दाखवले. इतरांनाही प्रोत्साहित केले. ऊस विकायचा कुठे? यांचाही पर्याय त्यांनी शेतकऱ्यांसाठी आधीच उपलब्ध करून दिला होता.

Farmer Kanchan Gadkari holding a giant 1 kg onion from her experimental farm, where she produced 13 tons per acre using an innovative method.
Priya Phuke case : ''सुषमाताई, रोहिणीताईंनी राजकारण करण्यापेक्षा वाद सोडण्यासाठी प्रयत्न केले असते, तर..''

त्यांच्या बेला येथील साखर कारख्यान्यात उसापासून इथेनॉल, स्पिरटीसह वेगवेगळ्या उत्पादनाची निर्मिती केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात उसाची कारखानदारी मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. त्यांनाही गडकरी यांनी फक्त ऊस आणि साखर एवढ्यापुरतेच मर्यादित राहू नका असे सांगून त्यांनाही इथेनॉल निर्मितीचा सल्ला दिला. या माध्यमातून अनेक साखर कारखान्यांना त्यांनी या माध्यमातून दिवाळखोरीतून बाहेर काढले आहे. हे सर्व झाले नितीन गडकरी यांचे. मात्र आता कांचन गडकरी यांनीसुद्धा समजासेवा करताना त्यांच्या प्रमाणेच शेतीमध्ये प्रयोग करणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे कंचन गडकरी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ अलीकडेच स्पेनमध्ये आधुनिक शेती पाहण्यासाठी गेले होते. तेथील व्हॅनेलिया या संत्रा जातीचे उत्पादन त्यांनी आपल्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा या गावातील शेतामध्ये यशस्वीपणे करून दाखवले. ही संत्री मोसंबीप्रमाणे असते. शिवाय आपल्याकडील संत्र्यांच्या तुलनेत अनेक दिवसही टिकतात आणि त्याचा गोडावही अधिक आहे. या संत्र्याचा ज्यूस जास्त चवदार आणि उपयोगी ठरत आहे. आता या स्पेनमधील संत्र्याचे व्हेनेलिया जातीचे रोपटे आपल्याही देशात उपलब्ध झाले आहे. एवढेच नव्हे तर एका एकरात आपल्या संत्र्याच्या तुलनेत पाचपट अधिक उत्पादनही होत आहे. कांचन गडकरी या आपल्या शेतात जवळपास सर्व भाज्या पिकवतात. त्यासुद्धा सेंद्रीय खताद्वारे. यावर कुठलीही रासायनिक फवारणी केली जात नाही.

Farmer Kanchan Gadkari holding a giant 1 kg onion from her experimental farm, where she produced 13 tons per acre using an innovative method.
Rohini Khadse : ''आम्हाला आमच्या लाडक्या भावाकडून न्यायाची अपेक्षा होती''; रोहिणी खडसेंचा टोला!

शेती आणि आधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या कांचन गडकरी यांचा कांदा उत्पादनाचा प्रयोगही यशस्वी करून दाखवला आहे. याकरिता नेदरलँडवरून कांद्याचे बीज त्यांनी आणले. शेतात बेड तयार करून अडीच एकर जागेत रोपे उगवली. नंतर त्यांची पेरणी केली. यासाठी ‘मल्चिंग पेपर' हे तंत्रज्ञान वापरले. काळ्या आणि सिल्वर रंगाचे प्लास्टिकचा वापर पेरणीसाठी केला. यामुळे पाण्याचे तापमान संतुलित ठेवता येते. या शिवाय जमिनीतील ओलसरपणाही कायम राहतो. त्यांनी उगवलेल्या २४ हजार रोपांपैकी सरासरी फक्त सात ते दहा टक्के वगळता काद्यांची शेती चांगलीच फोफावली. तब्बल १२ ते १३ टण कांद्याचे उत्पादन त्यांच्या भक्ती फर्म येथे झाले आहे. हे तंत्रज्ञान आणि प्रयोग त्यांनी शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com