Manish Sisodia
Manish Sisodia sarkarnama
देश

Manish Sisodia : उपमुख्यमंत्री अडचणीत ; CBI कडून पुन्हा समन्स, सिसोदिया म्हणाले..

सरकारनामा ब्युरो

Delhi excise policy : राजधानी दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण गैरव्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. सीबीआयने उद्या (रविवारी) मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले आहे. समन्स पाठवल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनीष सिसोदिया म्हणाले, "सरकारने माझ्याविरोधात ईडी, सीबीआय आदी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशीचा सपाटा लावला आहे. माझ्या घरावर, कार्यालय, बँकेच्या लॅाकर तपासणी केल्यानंतरही तपास यंत्रणांच्या हाती काहीही लागले नाही,"

"मी दिल्लीतील सरकारी शाळेत उत्तम दर्जेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे. सरकार माझा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी मला उद्या सकाळी सीबीआय मुख्यालयात बोलावले आहे. मी जाऊन पूर्ण सहकार्य करेन," असे सिसोदिया म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली होती. दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अखेर केजरीवाल सरकारला हे नवे उत्पादन शुल्क धोरण रद्द करावे लागले होते.

गेल्या आठवड्यात दिल्लीत ईडीने मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते विजय नायर यांच्यासमवेत अन्य आरोपींची सुमारे ७६.५४ कोटी रुपयांची संपत्तीचे गोठवली होती. दिल्ली, मुंबई येथील घर, हॉटेल, वाहने, बॅकेची बेकायदा रक्कम ईडीने सील केली आहे.

नवी दिल्लीतील जोर बाग येथील व्यावसायिक समीर महेंद्रू आणि गीतिका महेंद्रू यांची ३५ कोटी रुपयांची संपत्ती, तर गुरुग्राम येथील आरोपी अमित अरोरा यांची ७.६८ कोटींची संपत्ती सील केली आहे.

‘सीबीआय’ने या प्रकरणी ‘इंडो स्पिरिट’चे मालक समीर महेंद्रू, गुरुग्राममधील ‘बडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक अमित अरोरा व ‘इंडिया अहेड न्यूज’चे व्यवस्थापकीय संचालक गौतम मुथांसह अनेकांची चौकशी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT