Prakash Ambedkar : आंबेडकरांनी ठाकरेंना दिला सल्ला ; 'या' मुद्दावर न्याय मिळेल..

Prakash Ambedkar on Shiv Sena Symbol : निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का?
Prakash Ambedkar, uddhav thackeray
Prakash Ambedkar, uddhav thackeraySarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar on Shiv Sena Symbol: केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (शुक्रवारी) शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी सल्ला दिला आहे. आंबेडकर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल."

Prakash Ambedkar, uddhav thackeray
Eknath Shinde : मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, 'या' नावाची चर्चा..

"केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे," असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar, uddhav thackeray
Kangana Ranaut : धनुष्यबाण शिंदेंकडे, कंगनानं सोडले ठाकरेंवर टीकेचे बाण ; म्हणाली, 'ते आता कधीच उठणार नाहीत..'

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शिंदे गटाकडून जोरदार जल्लोष सुरु असताना अभिनेत्री कंगना राणावत हीने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. कंगनाने टि्वट करीत निवडणूक आयोगाचे निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

"वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही," असे टि्वट कंगनाने केले आहे. यामुळे आता ठाकरे गट आणि कंगना वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com