CBI raid Karti Chidambaram
CBI raid Karti Chidambaram  Sarkarnama
देश

सीबीआयने फास आवळला; छापेमारीनंतर चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला अटक

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र व काँग्रेसचे नेते खासदार कार्ती चितंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी सीबीआयने व्हिसा लाचखोरी प्रकरणात नऊ ठिकाणी छापेमारी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या निकवर्तीयाला अटक करण्यात आली आहे. (Karti Chidambaram Latest Marathi News)

सीबीआयने मंगळवारी तमिळनाडूसह मुंबईतील प्रत्येकी तीन ठिकाणे तसेच पंजाब, कर्नाटक, ओडिशा येथील एका ठिकाणी छापेमारी केली होती. चिदंबरम यांचे निकटवर्ती एस. भास्कर रमण यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. (CBI has arrested S Bhaskar Raman a close associate of Karti Chidambaram)

चिनी कामगारांना एका प्रकल्पासाठी व्हिसा देण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांच्यावर आहे. याबाबत सीबीआयकडून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 2010 ते 2014 या कालावधीत पैसे परदेशात पाठवल्याचा आरोप आहे.

चिदंबरम यांच्यावर याआधीची आयएनएक्स मीडिया प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या परदेश प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांना काही अटींच्या आधारे परदेश प्रवासाठी परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, सीबीआयच्या कारवाईनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट करत टोला लगावला होता. 'असं कितीवेळा झालं आहे, हे मी विसरलो आहे. हा एक विक्रम ठरेल,' असं ट्विट चिदंबरम यांनी केलं आहे. याआधीही चिदंबरम यांच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी झाली आहे. 2019 मध्ये परदेशी निधीच्या एका प्रकरणात 16 ठिकाणी छापेमारी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT