Sonali Phogat  Latest News
Sonali Phogat Latest News Sarkarnama
देश

सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची CBI चौकशी करा; मुलगी यशोधराने केली मागणी

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि भाजपच्या (BJP) नेत्या सोनाली फोगाट (Sonali Fogat) यांच्या आकस्मात मृत्यूची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांची मुलगी यशोधरा फोगाट हिने केली आहे. सध्या गोवा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु असून या चौकशीवर कुटुंबीय समाधानी नसल्याचं तिनं म्हटले आहे. (Sonali Phogat Latest News)

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही या प्रकरणात सीबीआय चौकशीचं आश्वासनं दिलं असल्याचे यशोधराने सांगितलं आहे. सोनाली फोगाट यांच्या कुटुंबियांनी २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री खट्टरांची भेट घेतली होती. यावर बोलताना जर फोगाट यांच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली तर तसे निर्देश आम्ही देऊ, असे त्यांनी म्हटले होते. मात्र अद्याप सीबीआय चौकशीचा आदेश देण्यात आले नसून पोलिसांकडूनच चौकशी सुरू आहे.

दरम्यान, अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप सोनाली यांच्या मुलीनं केला असून आरोपीला गोव्यात ठेवण्यात आलं आहे. त्यांचा या हत्येमागचा हेतू काय होता? हे अद्याप आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. मग पोलीस नक्की काय करत आहेत? असा सवालही यशोधराकडून उपस्थित करण्यात आला आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यांचे बंधू रिंकू ढाका यांनी आपल्या बहिणीची तिच्या दोन सहकाऱ्यांनी हत्या केल्याचा दावा केला होता. यासंदर्भात त्यांनी गोवा पोलिसांकडे तक्रार केली असून. मृत्युच्या काही वेळ आधी सोनाली फोगाट यांनी आपल्या आई, बहिण आणि अन्य एका नातेवाइकांशी चर्चा केली आणि त्या वेळी त्या अस्वस्थ होत्या, असे रिंकू यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. मात्र शवविश्चेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू हा ड्रग्सच्या अतिसेवनाने झाल्याच स्पष्ट झाल आहे. मात्र कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची आग्रही मागणी लावून धरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT