Anil Ambani Sarkarnama
देश

CBI Raids Anil Ambani : अनिल अंबानींच्या घरासह 35 ठिकाणांवर सीबीआयचे छापे, तब्बल 17 हजार कोटी...

Anil Ambani Loan Fraud Case : अनिल अंबानी यांच्या निवास्थानी आज सकाळी सीबीआयचे अधिकारी दाखल झाले. तसेच त्यांच्याशी संबंधित 35 हून अधिक ठिकाणांवर छापा टाकला.

Roshan More

CBI News : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुप संबंधित 35 हून अधिक ठिकाणांवर सीबीआयने आज छापे टाकले. मिडिया रिपोर्टनुसार अनिल अंबांनी यांनी 17 हजार कोटींचे बँककडून कर्ज घेत फसवणूक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या पूर्वी ईडीने देखील छापेमारी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास सीबीआयचे अधिकारी अनिल अंबानीचे मुंबईत असलेल्या कफ परेड येथील निवास्थानी पोहोचले होते. अंबानी कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांनी कर्ज फसवणूक प्रकरणात तपास केला.

2017 ते 2019 च्या दरम्यान रिलायन्सने येस बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज शेल कंपन्या तसेच इतर कंपन्यांमध्ये वळवल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात सीबीआयकडून आणि ईडीकडून तपास केला जात आहे.

सीबीआयने या संदर्भात दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला आहे. ही प्रकरणे रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडला दिलेल्या कर्जांशी संबंधित आहेत. यात येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांचे नाव देखील समोर आले होते. तपासात नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, एनएफआरए आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या संस्थांनीही माहिती उपलब्ध करून दिली आहे.

ईडीच्या अहवालानुसार, नियोजित योजनेद्वारे गुंतवणूकदार आणि सार्वजनिक संस्थांची दिशाभूल करून पैसे वळवण्यात आले. या घोटाळ्यात कमकुवत कंपन्यांना कर्ज, एकाच संचालक व पत्त्यांचा वापर, आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज अशा अनेक अनियमितता आढळल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT