Rajasthan Chief Minister Ashok Gehlot Latest Marathi News Sarkarnama
देश

राजस्थानमध्ये होणार धमाका? सीबीआयच्या निशाण्यावर मुख्यमंत्र्यांचे बंंधू; घरावर टाकली रेड

थेट मुख्यमंत्र्यांच्या बंधूंना लक्ष्य करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे बंधू अग्रसेन गेहलोत यांच्या जोधपूर येथील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अग्रसेन यांची आधीही ईडीमार्फत (ED) चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्याभोवतीचा फास आवळत चालल्याचे दिसून येत आहे. (CBI Latest Marathi News)

काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली. याविरोधा काँग्रेसनं देशभर आंदोलन केले. मुख्यमंत्री अशोक गेहलोतही (Ashok Gehlot) त्यामध्ये अग्रभागी होते. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांचे बंधू अग्रसेन गेहलोत यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

अग्रसेन गेहलोत यांची खत गैरव्यवहार प्रकरणी चौकशी केली जात असल्याचे समजते. दोन वर्षांपूर्वी अग्रसेन यांच्याशी निगडित मालमत्तांवर ईडीने छापेही मारले होते. राजस्थानमध्ये 6 ठिकाणी, पश्चिम बंगालमध्ये 2 ठिकाणी, गुजरातमध्ये 4 ठिकाणी आणि दिल्लीत 1 ठिकाणी हे छापे मारले होते.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत असताना 2007 ते 2009 या काळात सबसिडी मिळालेली खते निर्यात करुन गैरव्यवहार केल्याचा आरोप अग्रसेन यांच्यावर आहे. ईडीने त्यांची चौकशी केली आहे. आता सीबीआयनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सबसिडी मिळालेली खतं ही गरीब शेतकऱ्यांसाठी असतात. पण अग्रसेन गेहलोत यांनी त्यांची कंपनी अनुपम कृषीच्या माध्यमातून त्याची अनुदानित दरात खरेदी करून नंतर ती मलेशिया आणि व्हिएतनामसारख्या देशांमध्ये चढ्या दराने विक्री केली, असा आरोप 2020 मध्ये ईडीने केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT