सैन्य भरतीवरून आगडोंब; इंटरसिटीनंतर जम्मू-तावी एक्सप्रेस अन् पॅसेंजरला लावली आग

बिहारमध्ये युवकांनी रस्त्यावर उतरत अग्निपथ योजनेला जोरदार विरोध सुरू केला आहे.
Trains set afire in Bihar
Trains set afire in BiharSarkarnama

नवी दिल्ली : सैन्य भरतीच्या ‘मिशन अग्निपथ’ योजनेच्या घोषणेनंतर सलग तिसऱ्या तिसऱ्या दिवशी बिहारमध्ये आगडोंब उसळला आहे. त्याचप्रमाणे हरयाणा, राजस्थानसह अन्य काही राज्यांमध्येही त्याचं लोण पोहचलं आहे. ही योजना रद्द करण्याची मागणी भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांकडून केली जात असून त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. (Agneepath Recruitment Scheme)

योजनेच्या विरोधात बिहारमध्ये आगडोंब उसळला आहे. संतापलेल्या युवकांनी गुरूवारी इंटरसिटी एक्सप्रेसच्या काही डब्ब्यांना आग लावली होती. त्यानंतर शुक्रवारी बिहारमधील मोहिउद्दीनगर स्टेशनमध्ये जम्मू तावी गुवाहाटी एक्सप्रेस पेटवून दिल्याचे समजते. (Agnipath keeps Bihar burning as more trains set afire)

Trains set afire in Bihar
विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजप शिवसेनेला देणार टक्कर; मुरजी पटेलांचं नाव आघाडीवर

तसेच लक्खीसराई जंक्शनमध्येही एका पॅसेंजर गाडीला आग लावण्यात आली आहे. याविषयी एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, काही युवकांनी गाडीला आग लावताना मी मोबाईल चित्रीकरण करताना थांबवले. माझा मोबाईलही हिसकावून घेतला. गाडीच्या चार ते पाच डब्यांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच नवी दिल्लीत या योजनेची घोषणा केली आहे. ‘अग्निपथ’ योजनेत दर वर्षी साधारणतः ५० हजार याप्रमाणे प्रत्येकी ४ वर्षांसाठी तरुणांची सैन्यभरती करण्यात येणार आहे. ४ वर्षांनी त्यातील २५ टक्के तरुणांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतले जाणार आहे, तर उर्वरित अग्निवीरांना निवृत्तिवेतन मिळणार आहे. त्यावरूनच तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ही योजना रद्द करण्याची मागणी तरूणांकडून केली जात आहे.

Trains set afire in Bihar
काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि मॉब लिंचिंग...! सुपरस्टार साई पल्लवीनं आगीत तेल ओतलं

योजनेअंतर्गत सैन्यात भरती झाल्यानंतर केवळ चार वर्षच सेवा करता येणार आहे. त्यामुळे तरूणांमध्ये रोष वाढला आहे. बिहारमधून सैन्यात जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पहिला आगडोंब याच राज्यात उसळला आहे. बुधवारपासूनच आंदोलन सुरू असून सलग तिसऱ्यादिवशी आंदोलनाची तीव्रता वाढली आहे.

राज्यातील जहानाबाद, बक्सर, आरा, नावादा, सिवान, छपरासह अनेक भागांत तरूणांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वेमार्गांवर आंदोलन सुरू केले आहे. भभुआ रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसला आग लावण्यात आली. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com