Arvind Kejriwal : Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : मद्य विक्री घोटाळा प्रकरण : केजरीवालांना सीबीआयचे समन्स; अडचणी वाढणार?

CBI News : अरविंद केजरीवालांना चौकशीसाठी हजर राहण्याचे सीबीआयचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : आपचे नेते मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वी अटक झाली. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सीबीआयने समन्स बजावले आहेत.

त्यामुळे आता दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत येवून पोहोचला आहे. मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचीही सीबीआय चौकशी करणार आहे.

केजरीवालांना 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजाण्यात आले आहेत. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर मनीष सिसोदिया यांना काही दिवसांपूर्वी अटक झाली. त्यानंतर आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT