Satyapal Malik CBI Summons : जम्मू- कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गेल्या आठवड्यात पुलवामा हल्ल्यासंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोबाल यांच्यासह केंद्र सरकारवर धक्कादायक आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर केंद्र सरकारने कोणतेही उत्तर दिले नाही. पण शुक्रवारी (२१ एप्रिल) सीबीआयने त्यांना समन्स पाठवल्याची माहिती समोर आली आहे. येत्या २७ आणि २८ एप्रिलला त्यांना चौकशीसाठी बोलवले आहेत. मलिक यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. पण सीबीआयने याबाबत अद्याप कोणतेही पुष्टी केलेली नाही. (CBI summons former Governor Satya Pal Malik; Read what is the case)
तीनशे कोटींच्या विमा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलवल आहे. हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने त्यांना २७ आणि २८ एप्रिलला त्यांच्या सोयीनुसार सीबीआयच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीबीआयने रिलायन्स इन्शुरन्स प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते.
रिलायन्स इन्शुरन्स प्रकरणी सत्यपाल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेसने ट्विट केले की, शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहावले नाही. सत्यपाल मलिक यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. हे तर होणारच होते." असे ट्विट करत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. (National Politics)
काय प्रकरण आहे?
सत्यपाल मलिक यांना 2018 मध्ये जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले होते. मलिक यांच्या कार्यकाळातच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले. यानंतर त्यांना मेघालयात राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. पण दरम्यान, 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 दरम्यान जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना दोन फाईल्स मिटवण्यासाठी आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा त्यांनी केला होता.
काश्मीरमध्ये गेल्यानंतर दोन फाईल्स त्यांच्याकडे मंजुरीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते. यातील एक फाइल अंबानींची होती आणि दुसरी आरएसएसच्या एका व्यक्तीची होती जी मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील मागील पीडीपी-भाजप युती सरकारमध्ये मंत्री होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खूप जवळ असल्याचा दावा करत होते.
हा घोटाळा असल्याची माहिती मला दोन्ही विभागांच्या सचिवांनी दिली आणि त्यानुसार मी दोन्ही करार रद्द केले, असे मलिक म्हणाले होते. प्रत्येक फाईल पास करण्यासाठी तुम्हाला 150 कोटी रुपये मिळतील, असे सचिवांनी आपल्याला सांगितल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.