Sugar Factory Election : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील अडथळा दूर झाला असून, उच्च न्यायालयानेे कारखान्याच्या निवडणुकीचा आता मार्ग मोकळा करून दिला आहे. उच्च न्यायालयाने चार आठवड्याच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत. (Latest Marathi News)
भवानीनगर तालुका इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २४ एप्रिल 2020 रोजी संपली होती. निवडणुकीची प्रक्रिया ही सुरू झाली होती. सुमारे 25000 सभासदांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सलग तीन वर्षे ऊस पुरवठा न करणाऱ्या व थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.
तसेच कोरोनाच्या काळामुळे संचालक मंडळाला वारंवार मुदतवाढ मिळाली होती. ऑक्टोंबर 2022 मध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. संचालक मंडळाच्या वतीने ही निवडणूक घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे के .आर. श्रीराम व न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या दोन सदस्य खंडपीठाने आज छत्रपती कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातील याचिकेवरती सुनावणी करताना कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम चार आठवड्याच्या आत जाहीर करण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.
यामुळे गेल्या तीन वर्षापासून लांबलेल्या कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने कायदा व पोटनियमाला धरून यादी तयार करण्याचे आदेश निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत. या संदर्भात जाचक त्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी असून कायदा व पोटनियमाच्या आधारे मतदार यादी तयार होणार आहे.
सुनावणीसाठी कारखान्याच्या वतीने उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक एडवोकेट रणजीत निंबाळकर, बाळासाहेब पाटील हजर होते. यासंदर्भात निंबाळकर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निकालामुळे सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार मिळेल. कारखान्याच्या वतीने एडवोकेट अभिजीत कुलकर्णी यांनी बाजू मांडली तर जाचक यांच्या वतीने एडवोकेट श्रीनिवास पटवर्धन, अनिल अंतुरकर यांच्या सहकाऱ्यांनी बाजू मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.