Teacher eKYC deadline extension Sarkarnama
देश

CBSE New Decision : CBSE चा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता नववी-दहावीत मिळणार 'व्होकेशनल' शिक्षण

CBSE vocational education for class 9 and 10 : CBSE ने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना व्होकेशनल म्हणजेच व्यावसायिक व कौशल्याधारित शिक्षण मिळणार. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Rashmi Mane

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE ने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी नववीच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या शैक्षणिक आराखड्यानुसार विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षण (Vocational Education) घेणे अनिवार्य असणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच विविध व्यावहारिक कौशल्ये शिकण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या पद्धतीतही काही बदल करण्यात आले आहेत.

CBSE ने 29 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात नवीन परिपत्रक जारी केले आहे. हे बदल 2026-27 मध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू होतील. हे विद्यार्थी 2027-28 मध्ये दहावीत गेल्यानंतर नव्या नियमांनुसार परीक्षा देतील. मात्र, सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना या बदलांचा परिणाम होणार नाही.

नववी-दहावीत कोणते विषय असणार?

नव्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना 3 भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण अशा 9 विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मंडळाने दिलेल्या यादीतून 1 अतिरिक्त ऐच्छिक विषय निवडण्याची संधी असेल.

22 कौशल्य विषयांमधून निवडीची संधी

CBSE ने विद्यार्थ्यांसाठी 22 कौशल्याधारित विषय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये रिटेल, माहिती तंत्रज्ञान (IT), सुरक्षा, ऑटोमोटिव्ह, पर्यटन, कृषी, बँकिंग आणि विमा, मार्केटिंग, हेल्थकेअर, फूड प्रोडक्शन, ब्युटी अँड वेलनेस, मल्टिमीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर यांसारख्या विषयांचा समावेश आहे.

दहावीच्या बोर्ड परीक्षेत काय बदल?

नव्या नियमानुसार दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी 5 मुख्य विषय अनिवार्य असतील. यामध्ये 2 भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांचा समावेश आहे. प्रत्येक विषयात बोर्ड परीक्षा आणि अंतर्गत मूल्यांकन मिळून किमान 33% गुण मिळवणे आवश्यक असेल.

काही विषय अभ्यासक्रमातून वगळले

नव्या आराखड्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या नववीच्या अभ्यासक्रमातून Individuals in Society आणि CT व AI मॉड्यूल्स वगळण्यात आले आहेत. तसेच दहावीच्या 2027-28 च्या अभ्यासक्रमातून Environmental Education हा विषयही वगळण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT