

हसन मुश्रीफांच्या जातीयवादाच्या आरोपावर शाहू महाराजांचे प्रत्युत्तर
गोकुळमध्ये जातीयवादाचा प्रश्नच नसल्याचे शाहू महाराजांचे स्पष्ट मत
कोरमचा अडथळा दूर करून बहुमताला महत्त्व देण्याचा सरकारला सल्ला
Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या पराभवानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी नविदच्या विरोधात जातीयवादी प्रचार केला असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यावर काँग्रेस नेते खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी प्रतिक्रिया देत मंत्री मुश्रीफ यांचा मुद्दा खोडून काढला आहे. शिवाय राज्य सरकारला सल्ला दिला आहे.
खासदार शाहू महाराज म्हणाले, "मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना माहित आहे. गोकुळमध्ये जातिवाद आणि धर्मवादाचा प्रश्नच येत नाही. गोकुळमध्ये ठरलेल्या कोरमचा आकडा मोठा आहे. यामध्ये दुरुस्ती करावी लागेल, हे शासन करून घेईल. सहसा कोणतीही बैठक होते. त्याचा कोरम एक तृतीया पेक्षा जास्त नसतो. गोकुळच्या बैठकीसाठी हा कोरम जास्त आहे. यात दुरुस्ती करून कोरमचा आकडा कमी केला पाहिजे, "
सहकार म्हणजे सर्वांनी एकमेकांशी सहकार्याने राहायला पाहिजे. एकमेकांना मदत केली पाहिजे. त्याला सहकार म्हणतात. गोकुळमध्ये हे कमी दिसते. कोरममध्ये दुरुस्ती केली तर सर्व बरोबर होईल सर्वात महत्त्वाचं आकडे आहेत. कोरम पेक्षा गोकुळ मध्ये मिळालेलं बहुमत महत्त्वाचं आहे. 14 संचालक झाली असती तर अडचण आली नसती. समविचारी आघाडीकडे बहुमताचा आकडा आहे त्यामुळे बहुमत महत्त्वाचं आहे. गोकुळ मधील कोरमचा अडथळा दूर करावा लागेल, असेही खासदार म्हणाले.
राज्यातील पाच विधानपरिषद जागांमध्ये सर्वांनी चांगला प्रयत्न केला, ज्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचलो त्यांना लोकांनी कौल दिला, असं मत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.