Police Recruitment Drug Case Sarkarnama
देश

drug case : पोलिसांची मोठी कारवाई, केरळमधील तरुणीसह दोन पदवीधर ड्रग्ज तस्कराना अटक; दोन विदेशी महिलाही ताब्यात

crime branch anti drug operation : सीसीबीच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ११.५० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

Aslam Shanedivan

  1. एसीपी एच के महनंद यांच्या नेतृत्वाखाली सीसीबीच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बागलूर परिसरात मोठी कारवाई केली.

  2. केरळमधील तरुणीसह दोन पदवीधर ड्रग्ज तस्करांना अटक करून तब्बल 11 50 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

  3. या प्रकरणात दोन विदेशी महिलांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Bengaluru News : अमली पदार्थ (ड्रग्ज) विरोधात मोहीम राबवणाऱ्या सिटी क्राईम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी मोठी कारवाई करत केरळमधील तरुणीसह दोन पदवीधर ड्रग्ज तस्कराना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ११.५० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

केरळमधील बागलूर येथे वास्तव्यास असलेले अश्विन (वय २४) आणि मुबीना (वय २५) हे अटकेत असलेले आरोपी आहेत. त्यांच्याकडून ८,३३५ एलएसडी स्ट्रिप्स, पाच किलो हायड्रो गांजा, ५३४ ग्रॅम चरस, दोन मोबाईल फोन तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली स्कूटर जप्त केली. ही माहिती शहराचे पोलिस आयुक्त सीमंत कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सीसीबीच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे एसीपी एच. के. महनंद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बागलूर परिसरात ही कारवाई केली. दोन्ही आरोपी बीबीएचे शिक्षण अर्धवट सोडून वर्षभरापासून बंगलूरजवळील एका प्रतिष्ठित अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. तपासात उघड झाले की, थायलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या केरळमधील आणखी एका व्यक्तीकडून अमली पदार्थ पाठवले जात होते. त्याच्या सूचनेनुसार हे दोघे ते ग्राहकांपर्यंत पोहोचवत होते.

१.५ किलो हायड्रो गांजा जप्त

याच पथकाने परदेशातून टपालाद्वारे मागवलेला १.५ किलो हायड्रो गांजा जप्त केला. आरोपींनी संशय येऊ नये म्हणून चॉकलेट आणि बिस्किटांच्या बॉक्समध्ये हा गांजा लपवून व्यवस्थित पॅक केला होता. हायड्रो गांजाची किंमत सुमारे १.५ कोटी असल्याचा अंदाज आहे. के. जी. नगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

दोन विदेशी महिला ताब्यात

दरम्यान, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन विदेशी महिलांवरही कारवाई केली. मायको लेआउट परिसरात छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. युगांडामधील रशीद आणि जाम कालिस्की या महिला व्हिसा कालावधी संपल्यानंतरही भारतात राहत असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. सीसीबीचे डीसीपी (गुन्हे-२) राजा इमाम कासीम यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी एच. के. महनंद तसेच निरीक्षक मंजाप्पा, रक्षित आणि शिवराजू यांच्या पथकाने ही कारवाई केली.

FAQs :

1. ही कारवाई कोणी केली?
सीसीबीच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एसीपी एच के महनंद यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली.

2. किती किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले?
सुमारे 11 50 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

3. आरोपी कोण आहेत?
केरळमधील एक तरुणी आणि दोन पदवीधर तरुणांना अटक करण्यात आली आहे.

4. विदेशी महिलांची भूमिका काय आहे?
दोन विदेशी महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.

5. पुढील कारवाई काय असेल?
पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून ड्रग्ज रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT