देश

अब तुम्हारे हवाले वतन साथियो! CDS बिपीन रावत अनंतात विलीन

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण दलांचे प्रमुख (CDS) जनरल बिपीन रावत,यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीतील बरार स्क्वायर स्मशान भुमीत आज (१० डिसेंबर) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्काराला देशभरातील मंत्री उपस्थित होते. बिपीन रावत यांना अखेरचा सलाम देताना तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला तमिळनाडूतील कुन्नूर येथे अपघाती निधन झाले. ते व्हिआयपी हेलिकॉप्टरने कोईंबतूरहून दिल्लीला निघाले होते. मात्र कुन्नर येथे पोहचल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.

अपघात झाला त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी १४ सहकारीही प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात आले.

बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवांना विविध देशांतील संरक्षण दलांच्या उच्च अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत सीडीएस जनरल बिपिन रावत आणि पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवांना श्रद्धांजली वाहिली.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील बरार स्व्केअर स्मशन भुमीत सीडीएस जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण सल्लागार अजित डोवाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ आणि परराष्ट्रीय मंत्र्यांसह देशभरातील अनेक केंद्रीय मंत्री आणि जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT