Dr Subhash Bhamre
Dr Subhash Bhamre Sarkarnama
देश

CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी व्हावी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : तामिळनाडू येथील कुन्नूर (Kannur) येथे भारतीय लष्कराच्या (Indian Army) Mi- 17V5 या हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याच हेलिकॉप्टरमधून संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे प्रवास करत होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असून याबाबतची अधिकृत माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भांबरे (Subhash Bhamre) यांनी केली आहे.

CDS रावत त्यांच्यासोबत सेनेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला असून स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसात आतापर्यंत या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळीली आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली होती. सद्धया घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र, अपघात झालेले ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

दरम्यान, भांबरे यांनी या अपघाताबाबत माहिती देतांना अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. अपघात झालेल्या हेलिकॉप्टरची निघण्यापुर्वी पुर्ण तपासण्या केल्या जातात. मात्र, हा अपघात झालाच कसा याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. रावत यांनी प्रवास केलेले Mi- 17V5 हे हेलिकॉप्टर सर्वात सुरक्षित व अतिमहत्वाच्या म्हणजे संरक्षण मंत्री, राज्य संरक्षण मंत्री, सेना प्रमुख, व महत्वाच्या अधिकाऱ्यांसाठीच याचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांंनी सांगितले. तसेच, या हेलिकॉप्टरला दोन इंजिन असून तपासणी रिपोर्टनंतर हेलिकॉप्टर उड्डाण करते, असे भांबरे यांनी सांगितले. रावत यांच्या प्रकृती ही चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, झालेला हा अपघात कश्यामुळे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT