Helicopter Crash : बिपीन रावत यांच्यासोबत कोण होते? नावे आली समोर...

Bipin Rawat, Mahulika Rawat
Bipin Rawat, Mahulika RawatSarkarnama

नवी दिल्ली : हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) गंभीर जखमी झाले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये चौदा जण होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

रावत प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला तमिळनाडतील कुन्नूर येथे दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. रावत यांना किती दुखापत झाली आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही. तसेच मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासोबत असलेल्यांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये रावत यांच्या पत्नी मधूलिका (Madhulika Rawat) यांही होत्या.

Bipin Rawat, Mahulika Rawat
Breaking : सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात

त्याचप्रमाणे रावत यांच्यासोबत ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लगेच पेट घेतला. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. त्यावेळी स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात नेल्याचे समजते.

अपघातानंतर हेलिकॉप्टर जळून खाक झाले आहे. जवळच्या नागरिकांना तातडीने बचाव कार्य सुरू केले. त्यांनीच चौघांचे मृतदेह बाहेर काढल्याचे समतजे. ते 80 टक्के भाजल्याची माहिती आहे. लष्कराचे अधिकारी तिथे दाखल झाले असून बचावकार्याला वेग आला आहे. भारतीय हवाई दलाने घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार रावत हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. रावत यांच्यासह अन्य काही जणांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह घटनास्थळावर जाणार असल्याचे समजते. त्यांनी या अपघाताची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com