Rajya Sabha Discussion : केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेवरून कर्नाटकमधील तीन खासदारांमध्ये राज्यसभेत चांगलाच वाद रंगला.
केंद्र सरकार अन्नसुरक्षा योजनेतून देशभरातली 81 कोटी लोकांना मोफत धान्य पुरवलं जात आहे. पण प्रत्यक्षात तसं होत नाही, प्रत्यक्ष तसं होत नाही. सरकारचं लक्ष्य आणि लक्ष्यपूर्ती यांच्यामध्ये अंतर असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. या आरोपांवरून राज्यसभेत चांगली 'तूतू-मैमै' सुरू झाली.
काँग्रेसचे (Congress) खासदार जयराम रमेश यांनी जनगणना झाली नसल्याने काही कोटी लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळत नाही. या आरोपावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोलमाल उत्तर दिलं. कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मोफत धान्य देण्यात तेथील सरकार अडचणी आणत आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी तिथं यात लक्ष दिले पाहिजे.
जयराम रमेश आणि प्रल्हाद जोशी यांच्यात 'तूतू-मैमै' सुरू असतानाच, मल्लिकार्जुन खरगे यांनी जोशी तुम्ही देखील कर्नाटकचे आहात, असा टोला लगावला. यावर भाजप (BJP) केंद्रीय मंत्री जोशी यांनी आपण सगळे एकच आहोत. सभागृहाबाहेर आम्ही मित्रच असतो.
जयराम रमेश, प्रल्हाद जोशी आणि मल्लिकार्जुन खरगे हे तिघे कर्नाटकमधील खासदार आहे. या तिघांमध्ये सुरू असलेल्या वादात, उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी तुम्ही एकमेकांचे मित्र आहेत, तर सभागृहात मतभेदाचे नाटक का करता?, असा सवाल केला. यावर केंद्रीय मंत्री जोशी सभागृहाबाहेर सर्वच खासदार एकमेकांचे मित्र असतात, अशी टिप्पणी केली.
उपराष्ट्रपती जगदीश धनखड हे मध्यतंरी आजारी आहे. मल्लिकार्जुन खरगे बोलण्यास उभे राहिल्यानंतर त्यांनी मला जास्त काही बोलायचं नाही. तुमची तब्येत ठीक नाही, असे म्हणाले. त्यावर उपराष्ट्रपती खरगे यांनी माझी तब्येत ठीक आहे, असे सांगून विषय संपवला. धनखडे एम्समध्ये उपचारासाठी दाखल असताना सोनिया गांधी यांनी त्यांच्या पत्नीला फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.