Nitin Gadkari news : 'पुलकरी', 'रोडकरी' नंतर आता गडकरी झाले 'जॉन केनेडी' ; राज्यापालांनीच बहाल केली नवी पदवी!

CP Radhakrishnan on Nitin Gadkari : विशेष म्हणजे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनीसुद्धा गडकरी यांच्या कल्पक नेतृत्वात महाराष्ट्रात झालेल्या रस्त्यांची आणि उड्डाणुलांची दखल घेतली होती.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari is John Kennedy : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि रस्ते यांचे नाते अतुट असे आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकामंत्री खात्याला त्यांनी आपल्या कामाने ग्लॅमर मिळवून दिले. तेव्हापासून हे खाते किती महत्त्वाचे आहे याची जाणीव सर्वांनाच झाली.

दिल्लीत गेल्यानंतरही त्यांना हेच खाते देण्यात आले. त्यांचा कामाचा वेग, धडाडी आणि देशभरात विणलेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे ते सर्वांचेच लाडके झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे त्यांना ‘पुलकरी‘ असे संबोधत होते. कोणी त्यांना 'रोडकरी' म्हणातात. आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांचा 'भारताचे जॉन केनेडी' असा उल्लेख करून त्यांना एकप्रकारे सर्वोच्च अशी पदवी बहाल केली.

Nitin Gadkari
Atul Londhe : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंच्या अडचणी वाढणार?; भाजपच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल!

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन(CP Radhakrishnan) व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवार नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) पहिला पदवीदान दीक्षांत पार पडला. यावेळी राज्यपालांनी गडकरी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, ‘देशाच्या विकासात चांगले रस्ते महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी म्हणायचे. गडकरींनी देशभरात केलेले काम बघून मी त्यांना भारताचे जॉन एफ केनेडी’ मानतो.

Nitin Gadkari
Dhananjay Munde and Karuna Sharma love story : धनंजय मुंडे अन् करूणा शर्मांची पहिली भेट होती अगदी फिल्मी ; जाणून घ्या, 'Love Story '

गडकरीसुद्धा रस्त्यांचे महत्त्व पवटून देताना नेहमची अमेरिकेचे उदाहरण देतात. आम्ही श्रीमंत आहोत म्हणून आमच्या देशातील रस्ते चांगले नाही तर रस्ते चांगले आहे म्हणून आम्ही श्रीमंत झालो आहोत असे गडकरी आपल्या भाषणातून सांगतात. राज्याचे आणि केंद्राचे सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करताना रस्त्यांच्या माध्यमातून देशाला श्रीमंत करण्याचा संकल्प गडकरी यांनी केला आहे. सार्वजनिख बांधकाम विभागाच्या खात्यात पैस असो वा नसो गडकरी मात्र कोट्यवधींच्या घोषणा करतात आणि संबंधित प्रकल्प पूर्ण करतात. बाजारातून पैसे कसे उभारायचे याचे अचूक गणित गडकरी यांना साधले आहे. या जोरावर त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी किती कोटींची तरतूद केली, कमी केली की जास्त केली याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. कमी निधी दिला म्हणून नाराजीही व्यक्त केली नाही. निधीला कात्री लावल्याच्या बातम्यांकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. अकरा वर्षांपासून त्यांच्या कामाचा धडाका देशभरात सुरू आहे.

Nitin Gadkari
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेकडून छत्रपती शिवरायांचा अवमान - काँग्रेसचा आरोप! ; 12 तासांचा दिला अल्टिमेटम, नेमकं काय आहे प्रकार ?

विशेष म्हणजे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनीसुद्धा गडकरी यांच्या कल्पक नेतृत्वात महाराष्ट्रात झालेल्या रस्त्यांची आणि उड्डाणुलांची दखल घेतली होती. गडकरी खासदार नसताना त्यांना पंतप्राधन ग्राम सडक योजनेचे प्रमुख केले होते. खासदार झाल्यानंतर गडकरी हे रस्ते व वाहतूक खात्याचे मंत्री झाले. यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार राजेंद्र गोपछडे, आमदार संजय मेश्राम, एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com