The Central Government has directed major oil companies including Indian Oil, BPCL and HPCL to restrict diesel sales at retail outlets and prevent black marketing or unauthorized diversion. Sarkarnama
देश

Diesel Sale Rules : महाराष्ट्रात पेट्रोल पंपांवर रांगा, केंद्र सरकारने पहिल्यांदाच डिझेल खरेदीवर आणले निर्बंध; दिवसभरात किती लिटर मिळणार?

Diesel Purchase Limit : केंद्र सरकारने ११ जूनला हा आदेश काढला आहे. देशाच्या काही भागांत अचानक डिझेल विक्रीमध्ये वाढ झाल्याचे आढळून आल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Rajanand More

Central Government Order : मागील महिन्यांत महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यांमध्ये पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. अनेक ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केली जात असल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून आता डिझेल खरेदीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. मात्र, याचा सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता एका ग्राहकाला दिवसभरात केवळ २०० लिटर डिझेल खरेदी करता येणार आहेत. तसेच ग्राहकांने या डिझेलची पुन्हा इतरांना विक्री केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता कंपन्या किंवा व्यावसायिक ग्राहकांना सर्वसामान्य ग्राहकांसाठीच्या पंपांवर डिझेल दिले जाणार नाही.

केंद्र सरकारने ११ जूनला हा आदेश काढला आहे. देशाच्या काही भागांत अचानक डिझेल विक्रीमध्ये वाढ झाल्याचे आढळून आल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. हे निर्बंध सध्या ९० दिवसांसाठीच लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना इंधनाचा तुटवडा होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

मंत्रालयाने मोटर स्पिरिट अॅन्ड हाय स्पीड डिझेल (टेंपररी रेग्युलेशन ऑफ सप्लाय थ्रू रिटेल आऊटलेट्स) ऑर्डर, २०२६ हा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, डिझेल विक्री केवळ गाड्यांच्या इंधन टाक्या किंवा पेट्रोलियन अॅन्ड एक्सप्लोझिव्ह सेफ्ट ऑर्गनायझेशनने मान्य केलेल्या कंटेनरमध्येच केली जाईल. भारत पेट्रोलियन, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यासाठी सरकारने हा आदेश काढला आहे. संबंधित कंपन्यांवरच डिझेल विक्रीच्या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी असेल.

कारवाई करण्याचे आदेश

केंद्र सरकारने या आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कडक कारवाई होऊ शकते. साठेबाजी, काळाबाजार, अवैध खरेदी आणि चुकीच्या वापराविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT