.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Political News India : तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा देशाच्या राजकारणात सुरू आहेत. एवढेच नाही तर हे लोण काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या छोट्या पक्षांपर्यंत पसरले आहे. आता या सर्व पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे काँग्रेसमधीलच नेते म्हणून लागले आहेत. त्यामुळे पुढील काळातील काँग्रेसच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याबाबत उघडपणे भाष्य केले आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसपासून वेगळे होऊन जे पक्ष तयार झाले आहेत, त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. या पक्षांनी मनापासून राहुल गांधी यांना आपला नेता मानावे.
आता लोकशाही वाचवण्यासाठी लढाई लढण्याची वेळ आली आहे. आता इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे आहे, हा संदेश संपूर्ण देशात ठळकपणे गेला पाहिजे. तेव्हाच जनता तुमच्या पाठीशी उभी राहील. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, हे जनता पाहत आहे, असेही गेहलोत म्हणाले आहेत.
सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित राहुल गांधी यांना आपला नेता म्हणून स्वीकारले तर देशात वेगळा संदेश जाईल. असे झाल्यास देशातील मतदानाचा पॅटर्न बदलू शकतो, असा विश्वासही गेहलोत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना, समाजवादी पक्ष, सीपीआय, सीपीएम हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांच्याबाबत आम्ही दावा करू शकत नाही किंवा आग्रहही करू शकत नाही, असेही गेहलोत यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी टीएमसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँगेसमध्ये विलीन व्हावे, असे विधान केले होते. त्यावरून देशभरात विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस नेत्यांकडून त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.