CEC Rajiv Kumar  Sarkarnama
देश

Rajiv Kumar News : मुख्य निवडणूक आयुक्तांना अचानक Z Security; ‘गुप्तचर’च्या अहवालानंतर यंत्रणा सतर्क

Election Commission Of India : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चांगलाच वाढला आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतला जात आहे.

Rajanand More

New Delhi News : देशातील 543 लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. देशभरात राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात असतानाच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (Rajiv Kumar News) सुरक्षेविषयी मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाने याबाबतचा अहवाल दिला आहे.

राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) आहेत. त्यांच्या सुरक्षेविषयी गुप्तचर विभागाने (IB) इशारा दिला आहे. विभागाच्या सुरक्षाविषयक अहवालानंतर गृह मंत्रालयाने तातडीने राजीव कुमार यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, त्यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था देण्यात आली आहे.

झेड दर्जाच्या सुरक्षेमध्ये 33 सुरक्षा गार्ड तैनात असतात. सुरक्षा यंत्रणेतील दहा गार्ड संबंधित व्यक्तीच्या घरी असतात. तीन शिफ्टमध्ये 12 कमांडो, तीन प्रशिक्षित चालक चोवीस तास तैनात असतात. तसेच सहा पीएसओही चोवीस तास उपलब्ध असतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तृणमूल काँग्रेससह (TMC) आप आणि इतर विरोधी पक्षांकडून दिल्लीत सध्या आंदोलन केले जात आहे. तसेच विविध मुद्द्यांवरूनही विरोधकांकडून निवडणूक आयोगावर (Election Commission) टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजीव कुमार यांची सुरक्षा वाढवल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मे, चौथा 13 मे, पाचवा 20 मे, सहावा 25 आणि सातव्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी आहे. सर्व टप्प्यांतील मतमोजणी 4 जूनला होणार आहे.

राजीव कुमार यांनी 2020 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांचे निवृत्तीचे वय 65 वर्षे तर निवडणूक आयुक्तांचे निवृत्तीचे वय 62 वर्षे असते. मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. किंवा त्यांनी राजीनामा दिला तर दुसऱ्या आयुक्तांची नियुक्ती केली जाते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT