Extortion Case MLA : गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे आक्रमक आमदार चैत्तर वसावा, त्यांची पत्नी आणि अन्य सात जणांना स्थानिक कोर्टाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. २०२३ मध्ये एका वन अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणे आणि खंडणी प्रकरणात ते दोषी आढळून आल्याने कोर्टाने ही शिक्षा सुनावणी आहे.
आपचे राज्यातील आक्रमक आदिवासी आमदार म्हणून वसावा यांनी अत्यंत कमी कालावधीत आपला दबदबा निर्माण केला होता. नर्मदा आणि दक्षिण गुजरात भागात वसावा यांनी पक्षाला ताकद दिली होती. आदिवासी भागाचे पक्षाचे ते नेतृत्व करत होते. ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्षही आहेत. वसावा हे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही नर्मदा जिल्हा परिषदेसह विविध तालुका पंचायतींमध्येही आपला अभूतपूर्व यश मिळवून दिले होते. त्यामुळे त्यांना शिक्षा झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीआधीच पक्षासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. त्यांच्यावर नोव्हेंबर २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला होता.
नेमकं काय घडलं होतं?
वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी वसावा यांच्यासह अन्य सहआरोपींना समन्स बजावले होते. देदियापाडा पोलीस ठाण्यात २ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या नोंद झालेल्या एफआयआरनुसार, वसावा आणि त्यांच्या कुटुंबाने अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि वन विभागाकडून बाधित गावकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली होती. वसावा यांनी हवेत गोळीबारही केला होता. त्यांच्याकडे शस्त्र परवानाही नव्हता, असे आरोप एफआयआरमध्ये करण्यात आले होते.
याप्रकरणी वसावा यांच्यासह त्यांची पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या शकुंतला, जितेंद्र वसावा, रमेश वसावा व त्यांची पत्नी तसेच तीन गावकऱ्यांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये चार महिला आहेत. दरम्यान या शिक्षेनंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर षडयंत्र रचल्याचा आरोप केला. वसावा यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.