Hemant soren, Champai soren Sarkarnama
देश

Champai Soren Floor Test : चंपई सोरेन सरकारची आज अग्निपरीक्षा, अटकेत असलेले हेमंत सोरेन राहणार उपस्थित...

Hemant Soren News : सत्ताधारी महाआघाडीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राजद हे पक्ष सहभागी आहेत.विधानसभेची सदस्यसंख्या 81 आहे.

Roshan More

Political News : झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे चंपई सोरेन यांच्यासाठी आजचा दिवसा (सोमवार) महत्त्वाचा ठरणार आहे. विधानसभा अधिवेशनात चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे न्यायालयाच्या परवानगीने बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे 36 आमदारांना बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस आधीच हैद्राबाद येथे नेण्यात आले होते. ते आमदार विशेष विमानाने रविवारी (ता.4) रात्री रांचीमध्ये परत आले आहे. (Champai Soren Floor Test)

सत्तेत सहभागी असलेल्या महाआघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेसने बहुमत चाचणीसाठी आपल्या आमदारांना व्हिप जारी केले आहेत. पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी निर्देश देखील दोन्ही पक्षांकडून देण्यात आले आहेत. सत्ताधारी महाआघाडीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस (Congress), राजद हे पक्ष सहभागी आहेत. विधानसभेची सदस्यसंख्या 81 आहे. तर, महाआघाडीकडे बहुमतासाठी आवश्यक असेल्या 41 सदस्यसंख्ये पेक्षा पाच आमदार अधिक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कथित जमीन घोटाळा भोवला

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू होती. 31 जानेवारीला अटक होण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाकडून चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदासाठी राज्यपाल यांना आमदरांचे समर्थन असल्याचे पत्र दिले होते. राज्यपालांनी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील दिली होती. आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनात चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

महाआघाडी बहुमत सिद्ध करणार?

चंपई सोरेन हे 'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ते वरिष्ठ आणि हेमंत सोरेन यांचे विश्वासू नेते आहेत. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर लगेच चंपई यांच्या पक्षाच्या नेते पदी निवड करण्यात आली होती. या कठीण काळात ते पक्षाला टिकवून ठेवतील, असा विश्वास हेमंत सोरेन यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील दावा केला की सत्ताधारी महाआघाडी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करेल. न्यायालयाने देखील हेमंत सोरेन यांना बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे.

महाआघाडीतील पक्षीय बलाबल

झारखंड मुक्ती मोर्चा - 28

काँग्रेस -16

राजद - 1

सीपीआई (एमएल) - 1

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT