BJP Sarkarnama
देश

Chandigarh Deputy Mayor Election : अखेर भाजपला विजय मिळालाच; प्रत्यक्ष मतदानात आप-काँग्रेसला दणका...

BJP Political News : सुप्रीम कोर्टाने महापौरपदाच्या निडणुकीत आपच्या उमेदवाराला विजयी घोषित केल्यानंतर आज वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली.

Rajanand More

Chandigarh News : चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आप-काँग्रेस आघाडीच्या आठ नगरसेवकांची मतं बाद ठरवल्यानंतर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. कोर्टाने आघाडीच्या उमेदवाराला विजयी घोषित करत भाजपला दणका दिला होता. या प्रकरणावर पडदा पडल्यानंतर आता वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौर (Chandigarh Deputy Mayor Election ) पदासाठी निवडणूक झाली.

महापौरपदाच्या निवडणुकीत वीस मते मिळालेल्या आप-काँग्रेस आघाडीचा वरिष्ठ उपमहापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत (Election) पराभव झाला आहे. भाजपच्या उमेदवाराला 19 मते मिळाली, तर आघाडीच्या उमेदवाराला 16 मते मिळाली आहेत. आघाडीचे एक मत अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे भाजपने (BJP) दोन्ही पदांवर कब्जा केला आहे.

भाजपचे कुलजीत संधू वरिष्ठ उपमहापौरपदी निवडून आले आहेत. त्यांनी आघाडीचे उमेदवार गुरप्रीत गाबी यांचा पराभव केला. पंजाब (Punjab) आणि हरियाणा हायकोर्टाच्या आदेशानुसार महापौर कुलदीप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. याआधी ही निवडणूक 27 फेब्रुवारी रोजी होणार होती, पण काँग्रेसच्या (Congress) नगरसेवकांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमुळे ही निवडणूक आज झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंदीगड महापालिकेत एकूण 35 नगरसेवक आहेत, तर स्थानिक खासदारांनाही मतदानाचा अधिकार असल्याने एकूण 36 मतदान आहे. त्यानुसार बहुमतासाठी 19 चा आकडा गाठावा लागतो. महापौर निवडणुकीतील गोंधळादरम्यान आपचे तीन नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 19 वर पोहाेचले होते.

आप (AAP) व काँग्रेसला महापौर निवडणुकीत २० मते मिळाली होती. मात्र, तीन नगरसेवकांनी भाजपला साध दिल्याने हा आकडा १७ पर्यंत खाली आला. परिणामी, भाजपकडे बहुमत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार भाजपने दोन्ही पदांसाठी झालेल्या निवडणुकीत आघाडीचा पराभव करत महापौर पदाच्या निवडणुकीतील वचपा काढल्याची चर्चा आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

सुप्रीम कोर्टाने महापौरपदाच्या निवडणुकीत अवैध ठरवण्यात आलेली आठ मते वैध ठरविली. त्यानंतर कोर्टातच या मतपत्रिकांची तपासणी करून मतमोजणीही करण्यास सांगतिले. त्यामुळे आपच्या उमेदवाराला 20 मते मिळाल्याने विजयी घोषित करण्यात आले. कोर्टात पहिल्यांदाच अशाप्रकारे मतमोजणी करण्यात आली होती.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT