Lok Sabha Election 2024 : गुजरातमधील बड्या नेत्याला नकोय भाजपची उमेदवारी; नाव घेतले मागे...

BJP Leader Nitin Patel : नितीन पटेल हे गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री असून त्यांनी मेहसाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती.
Nitin Patel
Nitin PatelSarkarnama
Published on
Updated on

Gujarat News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024 ) भाजपने कंबर कसली असून काल 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. टप्प्याटप्याने इतर मतदारसंघातील नावेही जाहीर केली जाणार आङे. गुजरातमधील 15 मतदारसंघातील उमेदवारांचीही घोषणा करण्यात आली आहे. पण आता पक्षाला गुजरातमधून धक्का बसला आहे. बड्या नेत्याने आपल्याला उमेदवारी नको, असे म्हणत माघात घेतली आहे.

गुजरातचे (Gujarat) माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांनी उमेदवारी नाकारली आहे. ते मेहसाणा मतदारसंघातून इच्छूक होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीही मागितली होती. मात्र, पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्याला आला उमेदवारी नको, असल्याचे स्पष्ट केले आहे. एक्स हँडलवर पोस्ट करत त्यांनी आपली भूमिका स्षष्ट केली आहे.

Nitin Patel
Lok Sabha Election 2024 : तावडेंनी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत मोठी चूक; दुसरी यादी केली प्रसिध्द

गुजरातमधील जाहीर करण्यात आलेल्या 15 मतदारसंघांमध्य मेहसाणा मतदारसंघाचे नाव नाही. या मतदारसंघासाठीच पटेल यांनी उमेदवारी मागितली होती. नितीन पटेल यांनी म्हटले आहे की, मी मेहसाणा लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. काल राज्यातील 15 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. मेहसाणा जागेसाठी उमेदवारांची निवडप्रक्रिया अजून सुरूच आहे. त्याआधीच मी भाजपचा (BJP) उमेदवार म्हणून माजी उमेदवारी मागे घेत आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुजरातमध्ये एकूण 26 जागा असून अजून 11 मतदारसंघाचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. पक्षाचे सर्व 26 जागांवर लक्ष आहे. 2014 आणि 2019 मध्ये सर्व जागांवर विजय मिळवत इतिहास घडवला होता. आता या निवडणुकीतही हॅटट्रिक करण्याची तयारी भाजपने केली आहे. मात्र, यावेळी आम आदमी पक्ष (AAP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आघाडी झाल्याने भाजपसमोर काही प्रमाणात आव्हान उभे ठाकले आहे.

पवन सिंह यांची माघार

भाजपने भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांना पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. पण चोवीस तासांच्या आत त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी पवन सिंह यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.   

Nitin Patel
Lok Sabha Election 2024 : तावडेंनी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत मोठी चूक; दुसरी यादी केली प्रसिध्द

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com