Chandrababu Naidu | Rs 500 Note Ban | Digital Payments Sarkarnama
देश

Chandrababu Naidu : देशात पुन्हा नोटबंदी? 500 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीमुळे चर्चांना उधाण

Chandrababu Naidu on Rs 500 Note Ban : "बाजारात केवळ १०० आणि २०० रुपयांच्या नोटा चलनात ठेवाव्यात, अशी भूमिका नायडू यांनी मांडली. मोठ्या मूल्याच्या नोटांमुळे रोख व्यवहारांचे प्रमाण वाढते. त्याऐवजी डिजिटल पेमेंटचा वापर वाढवल्यास भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल."

Jagdish Patil

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोठ्या मूल्याच्या नोटा चलनातून हटवून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना नायडू यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केलेल्या डिजिटल चलनासंदर्भातील अहवालाचा उल्लेख केला. याआधीही आपण ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची मागणी केली होती, असे त्यांनी सांगितले.

बाजारात केवळ १०० आणि २०० रुपयांच्या नोटा चलनात ठेवाव्यात, अशी भूमिका नायडू यांनी मांडली. मोठ्या मूल्याच्या नोटांमुळे रोख व्यवहारांचे प्रमाण वाढते. त्याऐवजी डिजिटल पेमेंटचा वापर वाढवल्यास भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असेही नायडू यांनी म्हटलं आहे.

चंद्राबाबू नायडू नेमकं काय म्हणाले?

चंद्राबाबू म्हणाले, "जास्त मूल्याच्या रोख रकमेवर नियंत्रण आणल्यास आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिल्यास भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत होऊ शकते. तंत्रज्ञान अचूक असेल, तर गरिबी दूर करणं जास्त कठीण नाही.

त्यामुळे केवळ १०० आणि २०० रुपयांच्या नोटाच चलनात असायला पाहिजेत." दरम्यान, नायडू यांच्या या मागणीवर केंद्र सरकार काय भूमिका घेणार, खरंच पाचशे रूपयांच्या नोटा चलणातून काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT