Pawan Kalyan Divorce : उपमुख्यमंत्र्यांचा तिसऱ्यांदा घटस्फोट, सहमतीने वेगळा होण्याचा निर्णय

DCM Pawan Kalyan Divorce Wife Anna : परस्पर सहमतीने आणि आदराने वेगळा होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Andhra Pradesh Deputy CM Pawan Kalyan third marriage separation
Andhra Pradesh Deputy CM Pawan Kalyan third marriage separationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pawan Kalyan News : सिनेअभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि त्यांची पत्नी पत्नी अन्ना कोनिडेला यांनी सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. अन्ना या पवन कल्याण यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. यापूर्वी त्यांची दोन लग्न झाली होती. 2013 मध्ये त्यांनी लग्न केले होते.

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आपल्या आयुष्याती मोठा काळ एकमेकांसोबत घालवल्यानंतर परस्पर सहमतीने आणि आदराने वेगळा होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न संपले असले तरी मित्र म्हणून कायम राहू. मुलांसाठी आई-वडिलांची भूमिका जबाबदारीने पार पाडू. आमच्या मुलांचे कल्याण हीच आमची प्राथमिकता असेल.

पवन कल्याण हे राजकारण येण्यापूर्वी प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचे पहिला विवाह 1997 मध्ये झाला होता. तर, त्यांचा दुसरा विवाह अभिनेत्रा रेणु देसाई यांच्या सोबत 2009 मध्ये झाला होता. 2012 मध्ये त्यांनी घटस्फोट घेत तिसरा विवाह रशियन माॅडेल, अभिनेत्री अन्न यांच्यासोबत 2013 मध्ये केला होता. अन्न आणि पवन कल्याण यांना दोन मुलं देखील आहे.

Andhra Pradesh Deputy CM Pawan Kalyan third marriage separation
Pawan Kalyan : आंध्र प्रदेशच्या राजकारणात चलबिचल; भाजप, चंद्राबाबूंसोबतच्या आघाडीवरून पवन कल्याण यांच्या पक्षात नाराजी, कार्यकर्ते थेटच बोलू लागले...

विधानसभेत 100 टक्के यश

पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने 2024 मध्ये आंध्र प्रदेशची निवडणूक युतीमध्ये लढली होती. या निवडणुकीत पक्षाने लढवलेल्या 21 च्या 21 जागेंवर विजय मिळवला होता. तर, लोकसभेत त्यांना दोन जागा लढत दोन्ही जिंकल्या होत्या. टीडीपी, भाजप आणि जनसेना पक्षाची युती असून मु्ख्यमंत्रीपदी चंद्रबाबू नायडू हे आहेत.तर, उपमुख्यमंत्रिपद पवन कल्याण यांच्याकडे आहे.

Andhra Pradesh Deputy CM Pawan Kalyan third marriage separation
Pawan Kalyan : मुलगा आगीत गंभीर जखमी, तरीही पवन कल्याण यांनी आधी आदिवासींना दिलेला शब्द पाळला; आगीचा Video समोर