Narendra Modi, Chandrababu Naidu Sarkarnama
देश

Chandrababu Naidu : सभापतीपदावरून एनडीएत मतभेद! चंद्राबाबूंनी घेतली वेगळी भूमिका ?

Lok Sabha Speaker Election 2024 : लोकसभा अध्यक्षांची निवड 26 जून रोजी होणार आहे. यापूर्वी एनडीएच्या मित्र पक्षाशी चर्चा करण्याची जबाबदारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कडे देण्यात अली आहे.

Sudesh Mitkar

Mumbai News : देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षपदावरून राजकारण तापले आहे. लोकसभा निवडणुकीत 240 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभा अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवायचे असून, भाजप घटक पक्षांना उपसभापतीपदाची ऑफर देऊ शकते, असे बोलले जात आहे. लोकसभा अध्यक्षांची निवड 26 जून रोजी होणार आहे. यापूर्वी एनडीएच्या मित्र पक्षाशी चर्चा करण्याची जबाबदारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  यांच्या कडे देण्यात अली आहे. 

लोकसभेसाठी संसदेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. उमेदवाराचे नाव आदल्या दिवशी दुपारपर्यंत उघड होईल. एनडीएच्या मित्र पक्षांकडे लोकसभा उपसभापती पद असावे असे विरोधी पक्षांचे मत आहे. तसे न झाल्यास इंडिया आघाडी लोकसभेच्या उपसभापतीपदासाठी आपला उमेदवार उभा करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

लोकसभा अध्यक्षपद स्वतःकडेच राहावे, अशी भाजपची इच्छा आहे. भाजपच्या या निर्णयाशी नितीश कुमार सहमत आहेत, पण चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपीला वाटते की, लोकसभा अध्यक्षपदाची चर्चा आधी एनडीएमध्ये व्हावी, त्यानंतरच उमेदवाराचे नाव निश्चित केले जावे.  जेडीयूचे नेते केसी त्यागी याबद्दल म्हणाले की  आम्ही आणि टीडीपी एनडीएचा भाग आहेत. लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपने नियुक्त केलेल्या उमेदवाराला त्यांचा पक्ष पाठिंबा देईल. अध्यक्ष हा नेहमीच सत्ताधारी पक्षाचा असतो.

  टीडीपीने कोणती अट घातली 

टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी राम कामारेड्डी म्हणाले की, एनडीएचे मित्रपक्ष एकत्र बसून स्पीकरचा उमेदवार कोण असेल हे ठरवतील. एकमत झाले की तो उमेदवार उभा केला जाईल आणि त्यानंतर टीडीपीसह सर्व मित्रपक्ष त्या उमेदवाराला पाठिंबा देतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT