Uttar Pradesh BJP : यूपीमध्ये भाजपने इतक्या जागा कशा गमावल्या? अंतर्गत अहवालात खळबळजनक खुलासे

UP BJP LOk Sabha Election Result Report : उत्तर प्रदेश राज्यात भाजप दुसऱ्या क्रमांकावर घसरला. सपाला सर्वाधिक 37, भाजपला 33 आणि काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत. निकाल आल्यानंतर भाजपने पराभवाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून आता प्राथमिक अहवालातुन काही खुलासे बाहेर आले आहेत.
Yogi Adityanath, PM Narendra Modi
Yogi Adityanath, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत भाजपने 'यावेळेस आम्ही 400 पार करू'चा नारा दिला होता.  पण यूपीमध्ये त्याचा मोठा धक्का बसला.  उत्तर प्रदेश राज्यात भाजप दुसऱ्या क्रमांकावर घसरला. सपाला सर्वाधिक 37, भाजपला 33 आणि काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत. निकाल आल्यानंतर भाजपने पराभवाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून आता प्राथमिक अहवालातुन काही खुलासे बाहेर आले आहेत. 

यूपीमधील दारुण पराभवावर भाजप कडून विविध पातळ्यांवर अहवाल तयार केला जात आहे.  त्यानुसार भाजपचा मंडल स्तरावरील आपला पहिला अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच उमेदवारांकडून वेगवेगळे अभिप्राय घेतले गेले आहेत. 

विजय गृहीत धरला  


 
हा पहिला अहवाल 80 जणांची टीम तयार करत आहे. पराभूत उमेदवारांचा हा अहवाल यूपी भाजप हायकमांडला सादर केला जाईल. तो पुढे केंद्रीय हायकमांडकडे पाठवला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने उमेदवार स्वत:ला विजयी मानून अतिउत्साही झाले होते, असे सूत्रांच्या हवाल्याने पहिल्या अहवालात समोर आले आहे. प्रत्यक्षात 2014 मध्ये मोदी लाटेत ज्या प्रकारे उमेदवार विजयी झाले होते आणि 2019 मध्येही तशीच मोदी जादू दिसली होती, या वेळीही फारसा फरक पडणार नाही, असे ते गृहीत धरत होते. मोदींच्या नावावर मते मिळत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे ते गृहीत धरत होते.

खासदारांबाबत नाराजी


 दोनपेक्षा जास्त वेळा विजयी झालेल्या खासदारांबाबत जनतेत नाराजी होती. खासदार जिंकल्यावर कधीच येत नाहीत आणि भेटत नाहीत, असा समज यूपीच्या गावागावात होता. आजही अनेकांनी मोदींच्या नावाने भाजपला मतदान केले, पण जिथे विरोधी उमेदवार मजबूत होता किंवा इतर कारणांमुळे चांगला दिसत होता तिथे लोकांनी ईव्हीएमचे बटण दाबले. काही खासदारांचे वर्तनही चांगले नसल्याचे अंतर्गत अहवालातून समोर आले आहे.

  बहुतांश जुन्या उमेदवारांवर विश्वास


राज्यातील योगी सरकारने सुमारे 3 डझन खासदारांची तिकिटे रद्द किंवा बदलण्यास सांगितले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात येते. उमेदवारांची नावे जाहीर करताना मैदानावरील वातावरण त्यांच्या विरोधात असतानाही बहुतांश जुन्या उमेदवारांवरच विश्वास व्यक्त करण्यात आला. आढावा घेतला असता असे दिसून आले की तिकीट बदलले असते तर चांगले निकाल लागले असते.

Yogi Adityanath, PM Narendra Modi
Ranajagjitsinha Patil : मराठवाड्यातील मराठा चेहरा म्हणून राणा पाटील यांना विस्तारात संधी?

मायावतींची व्होट बँक अखिलेश यांच्यासोबत 


याशिवाय विरोधकांच्या प्रचारामुळे परिस्थितीची दिशाही बरीच बदलली. कडाक्याच्या उन्हात भाजप कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढता आले नाही. मोदी सरकार नक्कीच येणार असा समज लोकांमध्ये निर्माण झाला होता. नेत्यांनी रस्त्यावरून आणि घरोघरी जाण्याऐवजी रॅली आणि रोड शोवर लक्ष केंद्रित केले. मायावतींची खात्रीशीर व्होट बँक अर्थात दलित समाज यावेळी काही प्रमाणात अखिलेश यादव यांच्यासोबत दिसला. भाजपला सर्वात मोठा धक्का काशीमध्ये बसला, जिथे पंतप्रधान मोदींच्या विजयाचे अंतर वाढण्याऐवजी कमी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com