Rushikonda Palace
Rushikonda Palace Sarkarnama
देश

Rushikonda Palace : आधी बुलडोझर अन् आता 400 कोटींचा 'पॅलेस' ; CM चंद्राबाबू नायडूंचा जगन मोहन रेड्डींना दुसरा मोठा दणका!

Mayur Ratnaparkhe

Jagan Mohan Reddys Rushikonda Palace : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जनगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात विशाखाटपट्टणम येथे उभारण्यात आलेल्या अलिशान रुशिकोंडा हील पॅलेसचे दरवाजे रविवारी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. चंद्रबाबू नायडू सरकारने हा निर्णय घेतला आहे.

जगनमोहन रेड्डींच्या शासन काळात एकूण 452 कोटी रुपये खर्चून सात अलिशान रहिवासी आणि कार्यालयीन इमारतींचे निर्माण करण्यात आले होते.

चंद्राबाबू नायडू सरकारचा आरोप आहे की, रूशिकोंडा हिल्सवर बनवण्यात आलेल्या अलिशान पॅलेसची निर्मिती पर्यावरणाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून करण्यात आली आहे. कारण, जनग मोहन रेड्डी सरकारकडे अमरावतीहून राजधानी हलण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांनी पर्यटन विभागाच्या नावाखाली या अलिशान इमारतीची निर्मिती केली.

टीडीपी आमदार गंता श्रीनिवास राव यांनी रविवारी रुशिकोंडा हिल्सवर बनवण्यात आलेल्या अलिशान पॅलेसच्या पहिल्या दौऱ्यावर आलेल्या एनडीए प्रतिनिधी मंडळ आणि मीडियाचे नेतृत्व केले. यावेळी या पॅलेसमधील सौंदर्य आणि वस्तू पाहून लोक थक्क झाले.

रुशिकोंडा पॅलेस समुद्रच्या समोर 9.88 एकरावर पसरलेला आहे. जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळात उभारण्यात आलेल्या सात अलिशान इमारतींपैकी तीन विशेष रहिवासी इमारती आहेत. यामध्ये १२ बेडरुम आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या अलिशान सुविधा, फर्निचर, सामान, झुंबर, बाथटब आणि फ्लोर वर्कवर जनतेच्या पैसा वापरला गेला होता.

आंध्रप्रदेश पर्यटन विकास महामंडळातर्फे रुशिकोंडा हिल्सवर विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मे 2021 मध्ये CRZ म्हणजेच कोस्टल रेग्युलेटरी झोनची मान्यता दिली.

तर टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांचे म्हणणे आहे की जगन मोहन रेड्डी यांनी खास त्यांचे कॅम्प ऑफिस म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता. या इमारतीच्या बांधकामासाठी राज्याच्या तिजोरीतील 500 कोटी रुपये वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT