Anant Rai Maharaj:पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट; ममतादीदी पोहोचल्या थेट भाजप खासदाराच्या निवासस्थानी

CM Mamata Banerjee met bjp rajya sabha mp ananta maharaj:ममतादीदी आणि अनंत राय महाराज यांच्या भेटीने पश्चिम बंगालचे राजकारणात नवीन घडामोडींना वेग आला आहे. राजकीय विश्लेषक अनेक तर्क-वितर्क लावण्यात व्यग्र झाले आहेत.
CM Mamata Banerjee met bjp rajya sabha mp ananta maharaj
CM Mamata Banerjee met bjp rajya sabha mp ananta maharajSarkarnama
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे राज्यसभा खासदार अनंत राय महाराज यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. अनंत राय महाराज (Anant Rai Maharaj) यांच्या निवासस्थानी ममतादीदीचे जलोषात स्वागत करण्यात आले.

ममतादीदी (Mamata Banerjee) आणि अनंत राय महाराज यांच्या भेटीने पश्चिम बंगालचे राजकारण पेटलं आहे. राजकीय विश्लेषक अनेक तर्क-वितर्क लावण्यात व्यग्र झाले आहेत. उत्तर बंगालमधील राजकारणातील राजघराण्यातील प्रमुख चेहरा म्हणून अनंत राय महाराज यांची ओळख आहे. उत्तर बंगालमध्ये अनंत राय महाराज यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपले प्रस्थ वाढवलं आहे.

उत्तर बंगालमधील काही भागाचे स्वतंत्र्य राज्य करण्याची मागणी अनंत राय महाराज यांनी केली आहे. पीपुल्स असोसिएशनचे (जीसीपीए) अध्यक्ष असलेले अनंत राय महाराज यांचा परिसरात दबदबा आहे. "ग्रेटर कूचबिहार"चे आपण महाराज असल्याचे अनंत स्वत: सांगतात. भाजपने वर्षभरापूर्वी त्यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठवले आहे. पश्चिम बंगालमधून बीजेपीच्या तिकीटावर राज्यसभेत गेलेल ते पहिले खासदार आहेत.

CM Mamata Banerjee met bjp rajya sabha mp ananta maharaj
Tukaram Mundhe Transfer: डॅशिंग IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; 'या' पदावर नियुक्ती

गेल्या वर्षी अनंत यांच्या घरी गृहमंत्री अमित शाह गेले होते. त्यानंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली होती. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मागील मंत्रिमंडळात सहभागी असलेले निशिथ प्रमाणिक हेही अनंत यांचे निकटवर्तीय आहेत. तेही राजघराण्यातील आहेत.

पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातीजमातीची संख्या 18 टक्के आहे. यात राजघराण्यातील व्यक्तींची संख्या मोठी आहे. उत्तर बंगालमधील पाच जिल्ह्यातील 20 विधानसभा क्षेत्रात राजघराण्यातील व्यक्तीची निर्णायक मते आहेत. या पाच जिल्ह्यात कूचबिहार बरोबरच अलीपुरव्दार याचाही समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com