D Purandeshwari, Chandrababu Naidu Sarkarnama
देश

Daggubati Purandeshwari : लोकसभा अध्यक्षपदी चंद्राबाबूंची मेहुणी? मोदींची खेळी की दबाव!

Lok Sabha Speaker Modi Government PM Narendra Modi Chandrababu Naidu : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तास्थापनेनंतर कामाला सुरूवात केली आहे. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे.

Rajanand More

New Delhi : मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये घटकपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. मंत्रिमडळात खातेवाटप झाल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

चंद्राबाबूंच्या टीडीपीने अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे समजते. लोकसभेचे अध्यक्षपद हे एक महत्वाचे पद आहे. त्यामुळे ते आपल्याकडे ठेवण्यासाठीही भाजप आग्रही आहे. एकीकडे चंद्राबाबूंचा दबाव आणि दुसरीकडे सरकार स्थिर ठेवण्यासाठी भाजपच्या गोटातून डी. पुरंदेश्वरी यांचे नाव चर्चेत आल्याचे समजते.

डी. पुरंदेश्वरी या आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्ष आणि राजामुंद्री लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. टीडीपीचे संस्थापक एन. टी. रामाराव यांच्या कन्या असून चंद्राबाबूंच्या मेहुणी आहेत. पुरंदेश्वरी यांच्या बहीण चंद्राबाबूंच्या पत्नी आहेत. त्यामुळे भाजपकडून चंद्राबाबूंचे समाधान करण्यासाठी पुरंदेश्वरी यांचे नाव लोकसभा अध्यक्षपदासाठी पुढे केले जाऊ शकते.

पुरंदेश्वरी यांच्या नावावर चंद्राबाबूंचाही आक्षेप नसेल, या भूमिकेतून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एका दगडात दोन पक्षी मारले जातील. अध्यक्षपद आपल्याकडे राहील आणि चंद्राबाबूंचाही पाठिंबा मिळेल, या भूमिकेतून भाजपची ही खेळी असू शकते, अशी जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, एनडीएमध्ये भाजपला 240 जागा असून स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. चंद्राबाबूंच्या टीडीपीला आंध्र प्रदेशात 16 जागा मिळाल्या आहेत. तर नितीश कुमारांच्या जेडीयूला बारा जागा आहेत. या दोन एनडीएमध्ये भाजपनंतर हेच दोन सर्वात मोठे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांना पुढील पाच वर्षे गोंजारावे लागणार आहे. पुढील काळात काही विपरीत स्थिती निर्माण झाल्यास लोकसभा अध्यक्षपद हे महत्वाचे ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT