Odisha CM House : CM हाऊस लापता! मुख्यमंत्र्यांसाठी ‘नवीन’ घर शोधण्याची वेळ…

Naveen Patnaik Odisha BJP Government Chief Minster House : नवीन पटनायक यांनी मागील 24 वर्षे त्यांच्याच घरातून कामकाज केले आहे. त्यामुळे हेच घर मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळखले जात होते.
Odisha Assembly
Odisha AssemblySarkarnama
Published on
Updated on

New Delhi : ओडिशामध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे. पण त्याआधी येथील प्रशासनावर वेगळीच नामुष्की ओढवली आहे. नवीन मुख्यमंत्र्यांसाठी अधिकृत सरकारी निवासस्थान नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांसाठी निवासस्थानाच शोध सुरू आहे.

मागील 24 वर्षे मावळते मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्याच घरातून कामकाज पाहिले. घराला नवीन निवास असे नाव देण्यात आले होते. हेच घर मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळखले जात होते. पण आता नवीनबाबूंची सत्ता गेल्याने नव्या मुख्यमंत्र्यांसाठी नवे घर शोधावे लागणार आहे.

भाजपकडून बुधवारी नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाऊ शकते. त्यानंतर एक-दोन दिवस नव्या सरकारचा शपथविधी होईल. पण मुख्यमंत्र्यांना लगेच स्वतंत्र निवासस्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना मुख्यमंत्री निवासात जाण्यासाठी काही दिवस लागू शकतात.

प्रशासनाकडून अधिकृत निवास निश्चित केल्यानंतर त्याच्यामध्ये नुतणीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी काही दिवस लागू शकतात. त्यानंतरच मुख्यमंत्री या घरात प्रवेश करू शकतात. त्यासाठी ओडिशा प्रशासन कामाला लागले आहे.

Odisha Assembly
PM Narendra Modi : मोदींची नव्या मंत्र्यांना तंबी; सकाळी 9 च्या आत ऑफिसात...

नवीन पटनायक यांच्याआधी काही मुख्यमंत्र्यांनी राजभवन आणि एका सरकारी क्वार्टरमध्ये राहत होते. त्यानंतर नवीन पटनायक यांनी याठिकाणी मुख्यमंत्री तक्रार कक्ष सुरू केला. त्यामुळे सध्या प्रशासनाकडून नव्या मुख्यमंत्र्यांसाठी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये एक प्रशस्त जागा निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, ओडिशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 147 पैकी 78 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने एकहाती बहुमत मिळवत नवीनबाबूंची सत्ता उलथवून टाकली. मागील 24 वर्षे राज्यात नवीन पटनायक यांची एकहाती सत्ता होती. आता राज्यात भाजप कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार, हे एक-दोन स्पष्ट होईल.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com