Chandrayaan-3 PM Modi News  Sarkarnama
देश

PM Modi News : २३ ऑगस्ट यापुढे ‘नॅशनल स्पेस डे’: मोदींची घोषणा ; म्हणाले, "मेक इन इंडियाला तुम्ही चंद्रावर पोहोचवलं.."

Chandrayaan-3 : एवढ्या परीक्षा दिल्यानंतर आपले लँडर चंद्रावर गेलं. त्यामुळे यश मिळायलाच हवं होतं.

सरकारनामा ब्यूरो

Bengaluru : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत त्यांना पुढच्या मिशनसाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या. यापुढे २३ ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’(२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस) म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

मोदींनी तीन मोठ्या घोषणा केल्या. दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन (नॅशनल स्पेस डे) साजरा करण्यात येईल, ज्या ठिकाणी लँडर चंद्रावर उतरले, त्या जागेला 'शिवशक्ती पॉइंट' असे म्हटले जाईल, तर ज्या ठिकाणी चांद्रयान-2 उतरले होते त्या जागेला 'तिरंगा' असे म्हटले जाईल, असे मोदींनी जाहीर केले. २३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल स्पेस डे’ म्हणून जाहीर केला जाईल. त्या दिवशी देशभर जल्लोष करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, "'चांद्रयान-3 लॅण्ड झाले तेव्हा मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्यात गुंतले होते. मला कधी असे वाटते की, मी तुमच्यावर अन्याय करतोय. माझी उत्सुकता आणि तुम्हाला त्रास. सकाळी-सकाळी मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचे होते. तुम्हाला लवकर तुम्हाला भेटायचं होते," "तुमच्या मेहनतीला सलाम, तुमच्या संयमाला सलाम, तुमच्या जिद्दीला सलाम, तुमच्या चैतन्यला सलाम,"असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले..

  • आता भारत चंद्रावर आहे, चंद्रावर आपला राष्ट्रीय अभिमान असून ज्या ठिकाणी कोणी गेले नव्हते तिथे आपण गेलो आहोत. आपण ते केले जे यापूर्वी कोणी केले नव्हते. हा आजचा भारत, निर्भय भारत, लढणारा भारत आहे. नव्या पद्धतीने विचार करणारा हा भारत आहे. जो डार्क झोनमध्ये जाऊनही जगात प्रकाशकिरण पसरवतो.

  • तुम्ही संपूर्ण पिढीवर तुमच्या यशाची छाप सोडली आहे. आता कोणताही मुलगा रात्री चंद्राला पाहिल तेव्हा त्याला वाटेल माझा देश ज्या हिंमतीने पोहोचला, तीच हिंमत त्या मुलामध्ये निर्माण होईल. तुम्ही भारतीय मुलांमध्ये अपेक्षांचं बीज रोवलं आहे. उद्या त्याचं वटवृक्षात रुपांतर होईल,

  • तुम्ही मेक इन इंडियाला चंद्रावर पोहोचवलं आहे. तुम्ही जे प्रयत्न केले, ते देशवासियांना माहीत झाले पाहिजे. भारताच्या दक्षिणेपासून चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरची सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी इस्रोने आर्टिफिशयल चंद्र बनवला. त्याची टेस्टही केली. एवढ्या परीक्षा दिल्यानंतर आपले लँडर चंद्रावर गेलं. त्यामुळे यश मिळायलाच हवं होतं.

    Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT