Bengaluru News : चांद्रयान-3 मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगसह महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या यशाला 'नव्या भारताची पहाट' म्हटले आहे. आज सकाळी (दि. २६ ऑगस्ट) आपला परदेश दौरा आटोपल्यानंतर मोदी थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ट्रॅकिंग आणि कमांड सेंटरमध्ये जाऊन शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्यासाठी पोहचले. (Latest Marathi News)
इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, "आज तुमच्यामध्ये येऊन मला आनंद होत आहे मी तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक होतो. ब्रिक्स कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी दक्षिण आफ्रिकेत गेलो होतो, पण माझे मन पूर्णपणे तुमच्यासोबतच होते. कधी कधी वाटतं की मी तुझ्यावर अन्याय करतोय. माझी घाई करण्यामुळे तुम्हाला त्रास झाला? इथे पहाटेच यायचे होते."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आपल्या मून लँडरला अंगदसारखे अढळ पाय मिळाले आहेत. एका बाजूला विक्रमचा विश्वास, तर दुसऱ्या बाजूला प्रग्यानचे शौर्य. आलेली चित्रे अप्रतिम आहेत. 'मानवी विकासाच्या इतिहासात पहिल्यांदाच माणूस त्या ठिकाणाचे चित्र स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहे. हे दाखवण्याचे काम भारताने केले आहे. तुम्ही सर्व शास्त्रज्ञांनी ते केले आहे."
"आपले चांद्रयान जिथे उतरले त्या चंद्रावरील ठिकाणाचे नाव भारताने ठरवले आहे. ते ठिकाण आता 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, असेही मोदी म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.