Chhattisgarh Assembly Election 2023 Result  Sarkarnama
देश

Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडमध्ये काँग्रेसला `पनौती`, नऊ मंत्री पिछाडीवर...

Chhattisgarh Assembly News : भाजपने बहुमताच्या दिशेने घोडदौड सुरू केली असून आतापर्यंत 55 जागांवर आघाडी घेतली आहे.

Jagdish Pansare

Chhattisgarh Assembly News : छत्तीसगड राज्यातील निवडणूक निकालांमध्ये धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. भाजपच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला होता. (Chhattisgarh Assembly Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर `पनौती` म्हणत टीका केली होती. परंतु खऱ्या अर्थाने छत्तीसगडमध्ये काँग्रेसलाच पनोती लागल्याचे चित्र आहे.

मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनूसार काँग्रेसच्या (Congress) सरकारमधील 9 मंत्री आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री भूपेश बाघेल (Bhupesh Baghel) यांनी कशीबशी आपली आघाडी राखली असली तरी ती पाच हजाराहून निम्यावर म्हणजे अडीच हजारापर्यंत खाली आली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाचीही खात्री सध्या तरी देता येत नाही अशी परिस्थिती आहे.

भाजपने (BJP) बहुमताच्या दिशेने घोडदौड सुरू केली असून आतापर्यंत 55 जागांवर आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्नही शेवटच्या टप्प्यात केला. (Chhattisgarh) पण भ्रष्टाचाराचे आरोप आणि मोदी गॅंरटीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. एकीकडे विद्यमान 22 आमदारांची उमेदवारी काँग्रेसने कापण्याचे धाडस दाखवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर दुसरीकडे सर्व 13 मंत्र्यांना मात्र पुन्हा उमेदवारी दिली. याच्या नाराजीचा फटका यातील बहुतांश मंत्र्यांना बसल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव अंबिकापुर मतदारसंघातून भाजप उमेदवार राजेश अग्रवाल यांच्यापेक्षा 1623 मतांनी पिछाडीवर आहेत. आरंग मतदारसंघातून शिवकुमार डहरिया हे 6077, गृहमंत्री ताम्रध्वज साहू 4674 मतांनी पिछाडीवर आहेत.

तसेच सीतापुर मतदारसंघातून अमरजीत भगत 3969 मतांनी, कोरबा मतदारसंघातून जयसिंह अग्रवाल 9522, साजा मतदारसंघातून रविंद्र चौबे, 964 कवर्धा येथून मोहम्मद अकबर 12092, तर कोंडागांव मतदारसंघातून मोहन मरकाम भाजप उमेदवारापेक्षा 66 मतांनी मागे आहेत.

यावरून छत्तीसगडच्या मतदारांमध्ये या मंत्र्याविरोधात किती नाराजी होती हे स्पष्ट होते. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाच जर आपल्या मतदारसंघात विजयासाठी झगडावे लागत असले, तर मग इतर उमेदवारांचे काय? हे एकूणच काँग्रेसच्या पिछेहाटीवरून दिसून आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT