Bhupesh Baghel Sarkarnama
देश

Chhattisgarh Election Result 2023 : छत्तीसगडमध्ये भूपेश बघेलांची दमछाक; भाजपलाही बहुमतापर्यंत पोहाेचणे कठीण

BJP Vs Congress : एक्झिट पोलचा कौल काँग्रेसच्या बाजूने असला तरी भाजपची जोरदार घोडदौड सुरू असल्याचे चित्र

Anand Surwase

Chhattisgarh Election Result : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या 90 जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या ठिकाणी दोन टप्प्यांत मतदान पार पडले होते. छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेच्या द्वंदयुद्धाचा आज फैसला होणार आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र, भाजप हा काँग्रेसची आकड्यांमध्ये पाठ सोडताना दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची मोठी मजल मारताना दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे.

छत्तीसगडमध्ये 90 जागांसाठी 7 आणि 17 नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या ठिकाणी काँग्रेस, भाजप, जनता काँग्रेस छत्तीसगड (जेसीसी) आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) हे चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच पाहायला मिळत आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर काही खासगी संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये जनमताचा कौल हा काँग्रेसच्या बाजूने दर्शवण्यात आला आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. असे असले तरी भाजपच्या नेत्यांनी मात्र आज मतमोजणीपूर्वीच भूपेश बघेल यांच्या सरकारला जनता कंटाळली आहे. जनमताचा कौल आम्हालाच मिळेल, असा दावा केला जात आहे.

57 चा आकडा 75 होईल : मुख्यमंत्री बघेल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस बहुमताने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदानानंतर एक्झिट पोलचे आकड्यामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहेच. मात्र, एक्झिट पोलने व्यक्त केलेला 57 चा आकडा हा मतमोजणीनंतर 75 होईल असेही मत बघेल यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केले होते.

काँग्रेस -भाजपकजून आश्वासनांची खैरा

या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने सत्ता कायम ठेवण्यासाठी विकासकामांच्या मुद्द्यांसह आश्वासनांची खैरात केली आहे. यामध्ये गृहलक्ष्मी योजना ही सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. त्याच प्रमाणे भाजपनेदेखील विवाहित महिलांना वर्षाला 12000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यासह दोन्ही पक्षांकडून आदिवासी विकास योजना, युवकांना नोकरी, शेतकऱ्यांना धान खरेदीमध्ये जास्तीचा दर, तेंदू पत्ता गोळा करणाऱ्यांसाठी विविध योजनांच्या आश्वासनाची खैरात केली आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार, याचा फैसला थोड्यावेळातच होणार आहे.

छत्तीसगडमध्ये आम्हीच सत्तेत येणार : माजी मुख्यमंत्री रमणसिंह

दरम्यान, आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सकाळीच भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री रमनसिंह यांनी छत्तीसगडमध्ये भाजप बहुमताने सत्ता स्थापन करेल, असा दावा केला आहे. भाजप 42 ते 55 जागांवर विजयी होईल, असा विश्वास रमनसिंह यांनी व्यक्त केला आहे.

घाबरलेल्या काँग्रेसचा पराभव निश्चित : भाजप प्रदेशाध्यक्ष

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस घाबरली असून, जेव्हा जेव्हा काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर असते तेव्हा ते ईव्हीएमसंदर्भात प्रश्न उपस्थित करतात. मात्र, आता काँग्रेसचा पराभव हा निश्चित आहे, छत्तीसगडच्या जनतेने काँग्रेस सरकारला नाकारले असल्याची प्रतिक्रिया साव यांनी दिली.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची आघाडी

छत्तीसगडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून, सकाळी 9.15 पर्यंत हाती आलेल्या 87 जागेचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये 54 मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर भाजप 33 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेसचे कल पाहिले असता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आकड वाढताना दिसून येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT