Chhattisgarh Maoist attack news : छत्तीसगढमध्ये १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला होता. माओवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता. या हत्याकांडप्रकरणी १० जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष NIA कोर्टाने बुधवारी हा निकाल दिला.
छत्तीसगढमधील झिरम घाटीतील राष्ट्रीय महामार्गावर २५ मे २०१३ रोजी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. सर्व नेते पक्षाच्या परिवर्तन रॅलीतून परत चालले होते. बस्तर जिल्ह्यातील या घटनेने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता. या हल्ल्यात राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची एक फळीच गेली होती.
हत्या झालेल्या नेत्यांमध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, त्यांचे पुत्र दिनेश माजी विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा, माजी केंद्रीय मंत्री विद्या चरण शुक्ला, माजी आमदार विजय मुदलियार यांच्यासह अन्य काही पदाधिकारी, सुरक्षारक्षक आणि काही नागरिकांचाही समावेश होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून या हत्याकांडाचा तपास करण्यात आला.
कोर्टामध्ये १०१ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच अनेक पुरावेही सादर करण्यात आले होते. याप्रकरणी विशेष न्यायाधीश अभय सिंह राजपूत यांच्या विशेष एनआए कोर्टाने दोन महिलांसह दहा जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्यावर २४ कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी सात गुन्ह्यांमध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शिक्षा झालेल्या दहा जणांना ३० दिवसांत हायकोर्टात अपील करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. हायकोर्टाचा अंतिम निकाल लागेपर्यंत ते तुरुंगातच राहतील. दरम्यान, २०१३ मध्ये राज्यात भाजपचे सरकार असताना हा हल्ला झाल्याने काँग्रेसकडून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.