ED Raid on Chaitanya Baghel Sarkarnama
देश

ED Raid on Chaitanya Baghel: माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या घरी EDचा छापा; 5 हजार कोटीचा गैरव्यवहार

ED raid on Bhupesh Baghel Son Chaitanya Baghel:मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले.

Mangesh Mahale

छत्तीसगढ़चे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे सुपुत्र चैतन्य बघेल यांच्या घरी आज सकाळी ईडीनं छापामारी केली आहे. ईडीनं राज्यात 14 ठिकाणी छापामारी केली आहे. यात चैतन बघेल यांच्या घरीही ईडीचे अधिकारी झाडाझडती घेत आहेत. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले.

ईडीनं सकाळीच छापेमारी सुरु केल्यानं छत्तीसगडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ईडीच्या वेगवेगळ्या टीम विविध ठिकाणी कारवाई करीत आहेत. महत्वाची कागदपत्रे आणि डिजिटल डाटा ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.

छ्त्तीसगड येथे झालेल्या मद्य गैरव्यवहाराशी संबधीत आहे. हा गैरव्यवहार 2161 कोटी रुपयांचा असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अनेक अधिकारी आणि एक माजी मंत्री अटकेत आहे. आता या प्रकरणाची तपास वेगाने सुरु झाल्याने अनेक जणांच्या अडचणी वाढल्या आहेत.

भूपेश बघेल म्हणाले, "सात वर्षांपूर्वीच कोर्टानं जो खटला रद्द केला होता, त्यावर आता ईडीचे अधिकारी नव्यानं तपास करीत आहेत. हे राजकीय षडयंत्र आहे. असे करुन काँग्रेसला थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे,"

ईडीच्या मतानुसार, ही छापेमारी छत्तीसगड मद्य गैरव्यवहाराशी संबंधीत आहे. माजी महसूलमंत्री कवासी लखमा यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. ते ईडीला योग्य माहिती देत नसल्याने त्यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. आता हा तपास चैतन्य बघेल यांच्यापर्यंत पोहचला आहे.

कवासी लखमा हे महसुलमंत्री असताना मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला होता. गेल्या 28 डिसेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. 15 जानेवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आत्तापर्यंत अनिल टुटेजा, अनवर ढेबर, एपी त्रिपाठी यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जण हे तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT