Andhra Pradesh: तिसरं अपत्य होऊ द्या! 50 हजार रुपये मिळवा; खासदाराची ऑफर

Third child scheme Andhra Pradesh: दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील घटत चाललेल्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. बिहार आणि उत्तरप्रदेशात तरुणाई संख्या जास्त आहे. तर दक्षिण भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे, असे नायडू म्हणाले होते.
Third child scheme Andhra Pradesh:
Third child scheme Andhra Pradesh:Sarkarnama
Published on
Updated on

आंध्र प्रदेशच्या एका खासदाराने तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी महिलांना ५० हजार रुपये अन् मुलाच्या जन्मासाठी गाय भेट देणार, अशी घोषणा केली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील जनतेला अधिक अपत्यांना जन्म द्या, यासाठी प्रोत्साहीत केले आहे. त्यानंतर विजयनगरमचे पक्षाचे खासदार कालीसेट्टी अप्पला नायडू यांनी ही घोषणा केली आहे.

नायडू यांची ही ऑफर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. टीडीपीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही घोषणा आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. विजयनगरम येथील राजीव क्रीडा संकुलात शनिवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आयोजित बैठकीत खासदार नायडू यांनी घोषणा केली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील घटत चाललेल्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. बिहार आणि उत्तरप्रदेशात तरुणाई संख्या जास्त आहे. तर दक्षिण भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे, असे नायडू म्हणाले होते.

Third child scheme Andhra Pradesh:
C. R. Patil: भाजप मंत्र्यानं औरंग्यावर बोलणं टाळलं! हा आमचा विषयच नाही...

लोकसंख्या नियंत्रणापेक्षा दीर्घकालीन व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वी मी कुटुंब नियोजन करा, अधिकची लोकसंख्या वाढवू नका, याचा प्रचार करीत होतो, पण आता माझा विचार बदलला आहे, लोकसंख्या वाढीचा प्रचार करीत आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com