Suspended advocate Rakesh Kishore being escorted after attempting to hurl an object toward CJI BR Gavai during Supreme Court proceedings. Sarkarnama
देश

CJI Bhushan Gavai update : सरन्यायाधीशांवर बूटफेक प्रकरणातील वकिलाचे जुने कारनामे उघड; ‘पुन्हा करू…’ म्हणत दादागिरी...

Shoe Attack Incident on Chief Justice Bhushan Gavai : आपण गोल्ड मेडलिस्ट असल्याची टिमकी मिरवणाऱ्या या वकिलाचा हिंसेशी जुना संबंध आहे. त्याच्या घराशेजारी राहणाऱ्यांनी ही माहिती दिली.

Rajanand More

Who Is Advocate Rakesh Kishor? His Past Controversies : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची दादागिरी कमी झालेली नाही. सोमवारी ही घटना घडल्यानंतर त्याने दुसऱयादिवशी मीडियाशी बोलताना पुन्हा असेच कृत्य करण्याची इशाजावजा धमकी दिली. आता त्याचे जुने कारनामेही समोर आले आहेत. तो राहत असलेल्या परिसरातील लोकांनीच त्याच्या कृत्यांचा पर्दाफाश केला आहे.

दिल्लीतील मयूर विहार या भागात राहणाऱ्या राकेश किशोर या 71 वर्षीय वकिलाने सरन्यायाधीश गवईंवर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांनीच या घटनेचा निषेध केला आहे. मात्र, त्यानंतरही या वकिलाला आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही. मंगळवारी मीडियाशी बोलताना परमात्म्यानेच आपल्याकडून हे कृत्य करून घेतल्याचे विधान केले होते. तसेच पुन्हा आपण असे करू शकतो, अशी धमकीही त्याने दिली आहे.

आपण गोल्ड मेडलिस्ट असल्याची टिमकी मिरवणाऱ्या या वकिलाचा हिंसेशी जुना संबंध आहे. त्याच्या घराशेजारी राहणाऱ्यांनी ही माहिती दिली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, 70 वर्षीय पुरूषोत्तम सांगितले की, हे पहिल्यांदा घडलेले नाही. असे हिंसक कृत्य यापूर्वीही केले आहे. 2021 मध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला त्यांनी मारहाण केली होती.

स्थानिकांनी किशोर याची पोलिसांतही तक्रार केली होती. त्यानुसार, वकिलाकडून परिसरातील नागरिकांना जवळपास एक वर्ष धमकी दिली जात होती, घाबरवले जात होते. त्याने सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जातीयवादी आणि धार्मिक शिवीगाळ केली होती. किशोर या रहिवाश्याने सांगितले की, किशोर यापूर्वी सोसायटीच्या रेसिडन्ट वेल्फेअर असोसिएशनचा सदस्य होता. त्याच्या कृत्यांविषयी यापूर्वी ऐकून होतो. पण सुप्रीम कोर्टात घडलेल्या घटनेने धक्का बसला.

सोसायटीच्या सुरक्षारक्षांनी सांगितले की, कुटुंबाने किशोर यांच्या घरी बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस भेटण्यास नकार दिला आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, ‘किशोरची तब्येत ठीक नाही. त्याला मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटत आहे.’ दरम्यान, कोर्टातील कृत्यानंतर बार काऊन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोरचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे त्याला यापुढे वकिली करता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT