IPS Death News : अतिरिक्त पोलीस महासंचालकांची आत्महत्या; IAS पत्नी मुख्यमंत्र्याच्या शिष्टमंडळासोबत परदेशात

ADGP Y Puran Kumar Found Dead at Chandigarh Home : IPS पूरन हे हरियाणातील 2001 च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. जवळपास त्यांनी पोलीस दलात 25 वर्षे सेवा केली आहे.
Police and forensic teams at the Chandigarh residence of ADGP Y Puran Kumar after the senior officer was found dead.
Police and forensic teams at the Chandigarh residence of ADGP Y Puran Kumar after the senior officer was found dead.Sarkarnama
Published on
Updated on

Haryana Police and Officials Confirm the Tragic Incident : हरियाणामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. राज्याच्या पोलीस विभागातील अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय. एस. पूरन कुमार यांनी चंदीगढमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

पूरन यांच्या पत्नी IAS असून त्या मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत जपान दौऱ्यावर आहेत. पत्नी परदेश दौऱ्यावर असताना पूरन यांनी आत्महत्या केल्याने या घटनेचे गुढ अधिक वाढले आहे. पोलिसांनी पूरन यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस दल हादरले आहे.

IPS पूरन हे हरियाणातील 2001 च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. जवळपास त्यांनी पोलीस दलात 25 वर्षे सेवा केली आहे. कार्यतत्पर आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची राज्याच्या पोलीस दलात ओळख होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

Police and forensic teams at the Chandigarh residence of ADGP Y Puran Kumar after the senior officer was found dead.
Local Body Elections : बंधू अन् सुनेसाठी दोन आमदारांची कसरत, काँग्रेसच्या गडावर शिवसेनेचा डोळा

पूरन यांच्या पत्नी अमनीत पी कुमार या हरियाणा केजरच्य वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या मुख्यमंत्री नायब सिंह सैना यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळासोबत जपानच्या दौऱ्यावर आहेत. पूरन यांनी सोमवारीच आपल्या गनमनकडून रिव्हॉल्वर घेतले होते. त्यानंतर आज त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घराच्या बेसमेंटमध्ये आढळून आला.

पूरन हे बेसमेंटमध्ये जाऊन बराच वेळ झाल्याने मुलगी त्यांना पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी पूरन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्याजवळ रिव्हॉल्वरही होते. मुलीने पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, पूरन हे सध्या पोलीस प्रशिक्षण कॉलेजमध्ये कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. आयपीएसच्या ज्येष्ठतेवरून ते सातत्याने प्रश्न उपस्थित करायचे. याबबात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल विज यांच्याशी पत्रव्यवहार केला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

Police and forensic teams at the Chandigarh residence of ADGP Y Puran Kumar after the senior officer was found dead.
CJI Bhushan Gavai update : गवईसाहेबांनी खिल्ली उडवली..! सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचे धक्कादायक विधान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे विविध बाजूने याचा तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच आम्ही त्याचा खुलासा करू, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com