देश

सुप्रीम कोर्टात पुन्हा मराठी ठसा : सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड यांची शिफारस!

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठीचा ठसा उमटणार आहे. पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याकडून ही शिफारस झाली. यामुळे आता पुन्हा सरन्यायाधीशपदाची मराठी व्यक्ती कार्यभार स्विकारणार आहे. चंद्रचूड यांच्या नावाचे शिफारस पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आलेले आहे. येत्या ८ नोव्हेंबरला ललीत सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होणार आहेत.

धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींपैकी सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. २०२४ अखेरपर्यंत ते कार्यमुक्त होणार आहेत. ते येत्या १० नोव्हेंबर २०२४ ला ते निवृत्त होणार आहेत. म्हणून चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांपर्यंतचा कालावधी उपलब्ध होणार आहे. सेवेच्या अखेरच्या दोन वर्षात ते सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत.

कोण आहेत धनंजय चंद्रचूड ?

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं संपूर्ण नाव 'धनंजय यशवंत चंद्रचूड' असे आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी न्यायाधीश म्हणूनही कार्यभार पेलले आहे. यानंतर चंद्रचूड यांनी अलाहाबाद न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे. धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हेही त्यांच्या काळात देशाच्या सरन्यायाधीशपदी होते. न्यायाधीश म्हणून त्यांनीही आपली सेवा दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT