"बाळासाहेबांचं नाव चोरण्याचा प्रयत्न : मोदी-शहा-फडणवीस सेनेने चमत्कार होत नाही"

Sushma Andhare : मशाल हे चिन्ह घेऊन शिवसेना लढण्यासाठी सज्ज आहे.
Sushma Andahare
Sushma AndahareSarkarnama
Published on: 
Updated on: 

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनचं पक्षचिन्हं गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटात आरोप - प्रत्यारोपांच्या सत्र सुरू झाले आहे. दोघांनाही धनुष्यबाण चिन्ह मिळणार नाही, असा आदेशच आयोगाने दिले होते. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला अखेर मशाल हे चिन्ह मिळाले. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकारनामाशी बोलताना आपली भूमिका सविस्तरपणे सांगितली.

सरकारनामाशी खास बातचीत करताना अंधारे म्हणाल्या, "मशाल हे चिन्ह घेऊन शिवसेना लढण्यासाठी सज्ज आहे. शिवसेनेचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने लिहीला जातोय. जे कुटील आणि जटील राजकरण भाजपाकडून केलं जातंय, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, या अन्यायाविरोधात आमचा शिवसैनिक मशाल हातात घेऊन गावागावात जाईल. आगामी निवडणुका लढवण्यासाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावच पुरेसं आहे. ठाकरे हे नाव लोकांच्या मनामनात, लोकांच्या हृदयात कोरलेलं आहे.

Sushma Andahare
"बाळासाहेबांच्या दुश्मनांचा उद्धव ठाकरेंच्या गळ्यात गळा," : भाजपची टीका

"बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला पेलणार आहे की नाही, हे आगामी काळात लोक त्यांना दाखवून देतील. चिन्हं लोकांपर्यंत पोहचवणं हे आव्हान नाहीये. हायटेक प्रसारमाध्यमात चिन्ह चटकन लोकांपर्यंत पोहचेल. बाळासाहेबांची शिवसेना कोणती आहे, हे लोक जाणतात.

Sushma Andahare
‘गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटले’

शिवसेनेचा कार्यकर्ता प्रक्षुब्ध आहे. चिडलेला आहे. ज्या प्रकारे बाळासाहेबांचं नाव या लोकांकडून चोरण्याचा प्रयत्न झाला. यावरूनच लक्षात येते की, आपल्या नावापुढे मोदी सेना, शहा सेना, फडणवीस सेना असे नाव लावून यांना तो चमत्कार साधता येत नाही," असेही अंधारे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.