Yashwant Varma Sarkarnama
देश

Yashwant Varma Controversy : कोट्यावधीचे घबाड सापडलेल्या न्यायाधीश शर्मांच्याबाबत मोठा निर्णय, तपास समितीचा अहवाल सरन्यायाधीशांकडे!

Chief Justice Sanjiv Khanna Yashwant Varma : दिल्ली न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना वर्मा यांच्या बंगलात नोटा भरलेली अनेक पोती भेटली.

Roshan More

Yashwant Varma News : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन न्यायाधीशांच्या समितीने वर्मा यांच्या घरी पैसे सापडल्याच्या घटनेस पुष्टी दिली आहे. या समितीने नुकताच आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना सोपविला होता. दरम्यान न्या. वर्मा यांना सरन्यायाधीशांनी राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

याधीश यशवंत वर्मा यांनी राजीनाम्यास नकार मिळाला तर त्यांच्याविरोधात महाभियोग चालविण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली जाऊ शकते. दिल्ली न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना वर्मा यांच्या तुघलक मार्गावरील सरकारी बंगल्यात आग लागली होती. आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन उच्च न्यायालयात दलाच्याकर्मचाऱ्यांना असंख्य पोत्यांमध्ये नोटा आढळल्या होत्या. यातील काही पोती जळून खाक झाली होती.

समितीकडून आरोपींची पुष्टी

या प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर हे प्रकरण सरन्यायाधीशांपर्यंत पोहोचले होते. यावर सरन्यायाधीशांनी वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली केली होती तसेच त्यांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयांच्या तीन न्यायाधीशांची तपास समिती नेमली होती. न्या. वर्मा यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य असून त्यांच्या घरी पैसे सापडल्याची पुष्टी समितीने केली आहे.

न्या.वर्मांना 9 मेपर्यंत मांडणार बाजू

वर्मा यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९ मे पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. वर्मा यांची अलाहाबाद न्यायालयात बदली करण्यात आली असली तरी न्यायिक काम करण्यास त्यांना मनाई करण्यात आली होती. दुसरीकडे वर्मा यांची इकडे बदली करू नये, असे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने आंदोलन केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT